India vs South Africa 2nd Test : मयंकचे शतक तर कोहलीचे अर्धशतक, पहिल्या दिवशी भारतानं केल्या 273 धावा

भारत-आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहली 63 तर अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 04:49 PM IST

India vs South Africa 2nd Test : मयंकचे शतक तर कोहलीचे अर्धशतक, पहिल्या दिवशी भारतानं केल्या 273 धावा

पुणे, 10 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतानं 273 धावांपर्यंत मजल मारली. यात मयंक अग्रवालने शतक आणि 50वा कसोटी सामना खेळणाऱ्या कॅप्टन कोहलीनं आपले अर्धशतक पूर्ण केले. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या 75 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 3 विकेट गमावत 273 धावांचा आकडा गाठला. सध्या कोहली 63 तर अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत आहेत.

या सामन्यात पुन्हा एकदा मयंक अग्रवालनं शानदार खेळी केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मयंकनं या सामन्यातही शतकी खेळी केली. 184 चेंडूत मयंकनं 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 104 धावा केल्या. पहिल्या सामन्यात दुहेरी शतक केलेल्या मयंकनं दुसऱ्या सामन्यातही दणक्यात खेळी केली. तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताला 10व्या ओव्हरमध्येच पहिला झटका बसला. रोहित शर्मा फक्त 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि मयंकनं शतकी भागिदारी केली. मात्र पुजारा अर्धशतकी खेळी करत बाद झाला. मयंकनं या सामन्यातही आक्रमक आणि संयमी खेळीचे योग्य प्रदर्शन केले. शतकी खेळी केल्यानंतर मयंक लगेचच 108 धावांवर बाद झाला.

मयंक अग्रवालनं आपल्या शतकासह विरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सेहवागनं 2009मध्ये सलामीचा फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात सलग शतकी खेळी करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता मयंकनं अशी कामगिरी केली आहे. याआधी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात मयंकनं 215 धावांची खेळी केली होती.

10 महिन्यांपासून विराटला शतकी खेळीची अपेक्षा

Loading...

कसोटी क्रिकेटमध्ये 81 सामने खेळणाऱ्या विराटनं 25 शतक लगावले आहे. मात्र विराटनं शेवटचे शतक 2018मध्ये लगावले होते. त्यानंतर त्यानं 10 कसोटी सामने खेळले आहेत, मात्र यात त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. गेल्या दहा महिन्यात 5 कसोटी सामन्यात विराटची सर्वोत्तम खेळी 82 धावा राहिली आहे. दरम्यान आपला 50वा सामना खेळत असलेल्या विराट 63 धावांवर खेळत आहे.

भारताकडे विक्रम करण्याची संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरेल. भारताने घरच्या मैदानावर खेळताना 10 कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी भारताकडे आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन वेळा घरच्या मैदानावर सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर भारताने 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून भारत विश्वविक्रम करू शकतो. भारताने फेब्रुवारी 2013 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

संभाव्य संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, उमेश यादव रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...