India vs South Africa : विराटसेना सुसाट! कॅप्टन कोहलीच्या शानदार खेळीने 7 विकेटनं जिंकला सामना

कर्णधार विराट कोहलीच्या एकहाती खेळीच्या जोरावर भारतानं पहिला सामना 7 विकेटनं जिंकला.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 10:22 PM IST

India vs South Africa : विराटसेना सुसाट! कॅप्टन कोहलीच्या शानदार खेळीने 7 विकेटनं जिंकला सामना

मोहाली, 18 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या एकहाती खेळीच्या जोरावर भारतानं पहिला सामना 7 विकेटनं जिंकला. या सामन्यात विराटनं 52 चेंडूत 72 धावा केल्या. याचबरोबर विराट सर्वात जास्त अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून आफ्रिकेच्या गोलंदाजांवर राज्य केले.

आफ्रिकेनं दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखऱ धवन यांनी चांगली सुरुवात केली. 4 ओव्हरमध्ये 33 धावांची भागिदारी या दोन्ही फलंदाजांनी केली, यात रोहित शर्मानं दोन उत्कृष्ठ षटकार लगावले. मात्र फेहलुकवायोनं आपल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. शर्मा 12 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटची अडखळत सुरुवात झाली. मात्र त्यानंतर धवन आणि कोहलीनं 51 धावांची भागिदारी केली.

शिखर धवन चांगल्या लयीत असताना मिलरनं सीमारेषेजवळ उत्कृष्ठ झेल घेतला. या झेल पाहून प्रेक्षकच नाही तर विराट आणि धवनही आवाक् झाले. काही सेकंद कोणालाच कळले नाही काय झाले. शिखर धवन 40 धावांवर बाद झाला. मात्र मिलरनं एका हातानं पकडलेला कॅच हा पहिल्या डावात विराटनं पकडलेल्या कॅचला टक्कर देणारा होता.

तत्पूर्वी भारतानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघानं भारताला 150 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून दीपक चहरनं दोन तर, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. नवदीप सैनीची शेवटची ओव्हर भारतासाठी महाग ठरली. या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 16 धावा केल्या.

Loading...

मात्र भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळं पहिल्या तीन ओव्हरमध्येच भारतानं 31 धावा दिल्या. त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर भारताला पहिले यश मिळाले. दीपक चाहरनं रीझा हेंड्रिक्सला बाद केले. मात्र त्यानंतर कर्णधार क्विंटन डी कॉकच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघानं चांगली सुरुवात केली. डी कॉकनं 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताच्या जलद गोलंदाजांची शाळा घेतली.

दरम्यान 52वर खेळत असताना नवदीप सैनीच्या चेंडुवर कॅप्टन कोहलीनं उत्कृष्ठ झेल घेत, भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये रवींद्र जडेजानं उत्कृष्ठ गोलंदाजी करत रॅसी वॅन डर डुसेनला एका धावावर बाद केले. डी कॉक बाद झाल्यानंतर क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या टेम्बा बवुमा आक्रमक फलंदाजी केली, मात्र 49 धावांवर त्याला चाहरनं बाद केले. हार्दिक पांड्यानं 18व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूत आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरला आपले शिकार झाला. मिलर 15 चेंडूत 18 धावा करत बाद झाला.

सुपरमॅन बनला कॅप्टन कोहली

गोलंदाजी अडचणीत असताना कोहलीनं सुपरमॅन बनत संघाला मदत केली. कर्णधार क्विंटन डी कॉकनं आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याची आक्रमक फलंदाजी भारतासाठी धोकादायक ठरत होती. याचवेळी 12व्या ओव्हरमध्ये नवदीप सैनीच्या चेंडूवर विराट कोहलीनं डाईव्ह मारत कॅच घेतला.

विराटनं आजूबाजूला कोणी फिल्डर नाही हे पाहते अगदी अखेरच्या क्षणात उडी मारत कॅच घेतला. या एका विकेटमुळं आफ्रिकेचा डाव 149वर आटपला.

VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय?आदित्य ठाकरेंनी केला हा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...