India vs South Africa : आफ्रिकाविरोधात 4 वर्षांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा लाइव्ह सामना

ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 03:20 PM IST

India vs South Africa : आफ्रिकाविरोधात 4 वर्षांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा लाइव्ह सामना

मोहाली, 18 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मोहालीच्या मैदानावर दुसरा टी-20 सामना होणार आहे. दरम्यान ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे.टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे.

आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. टी20 सामन्याचं लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. याशिवाय भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा

तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

टी 20 साठी भारतीय संघ

Loading...

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...