India vs South Africa : BCCIनं 9 कोटींसाठी टीम इंडियाची सुरक्षा सोडली वाऱ्यावर!

India vs South Africa : BCCIनं 9 कोटींसाठी टीम इंडियाची सुरक्षा सोडली वाऱ्यावर!

बीसीसीआयच्या एका चुकीमुळं टीम इंडियाची सुरक्षा धोक्यात, वाचा काय आहे प्रकरण.

  • Share this:

मोहाली, 17 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना मोहाली येथे 18 सप्टेंबरला होत आहे. यासाठी भारतीय संघ मोहाली येथे एक दिवस आधीच पोहचला आहे. दरम्यान पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुसऱ्या सामन्यावर आहे. मात्र या सामन्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहाली येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे. याचे कारण आहे बीसीसीआय.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबर रोजी धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेला सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान सोमवारी 16 सप्टेंबरला चंदीगड विमानतळावर भारतीय संघ पोहचला, मात्र त्यावेळी भारतीय संघाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नव्हती.

एकीकडे टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी भारतीय संघ सज्ज आहे तर दुसरीकडे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त प्राधान्य दिले आहे. मात्र चंदीगड पोलिसांनी भारतीय संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. बीसीसीआयच्या एका चुकीमुळं भारतीय संघाच्या सुरक्षा धोक्यात आली आहे.

बीसीसीआयनं थकवले 9 कोटी

मोहाली पोहचण्यासाठी भारतीय संघाचा अडचणींचा सामना करावा लागला, कारण चंदीगड पोलिसांनी टीम इंडियाला सुरक्षा देण्यास नकार दिला. त्यामुळं मोहाली पोलिसांना चंदीगड विमानतळावर जावे लागले. यामागे बीसीसीआयची एक मोठी चुक आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयनं चंदीगड पोलिसांचे 9 कोटी रूपये थकवले आहेत. दरम्यान फक्त भारतीय संघच नाही तर दक्षिण आफ्रिका संघालाही कोणतीही सुरक्षा मिळाली नाही.

Loading...

वाचा-दुसरा टी-20 पाहण्यासाठी आहात उत्सुक? पण त्याआधी जाणून घ्या मोहालीचे हवामान

चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा

तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

वाचा-...तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सट्टेबाजी अधिकृत आणि येणार मॅच फिक्सिंगचा कायदा

असे असेल मोहालीचे हवामान

धर्मशालामध्ये निराशा मिळाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मोहालीच्या हवामानावर आहे. दरम्यान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 18 सप्टेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली नाही. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. त्यावेळी मोहालीचे तापमान 28 ते 31 डिग्री असू शकते. दरम्यान मॅच सुरू असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास 5 टक्के किंवा 10 टक्के पावसाची शक्यता आहे.

असा आहे भारत-दक्षिण आफ्रिका दौरा

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. यात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 आणि तीन कसोटी सामना खेळण्यात येणार आहेत. दुसरा टी-20 सामना 18 सप्टेंबरला मोहालीला तर, तिसरा कसोटी सामना 22 सप्टेंबरला बंगळूरू येथे होणार आहे. दरम्यान कसोटी दौरा 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टनम येथून सुरू होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरला पुणे येथे आणि अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे.

वाचा-तू खींच मेरी फोटो! विराटसाठी अनुष्का झाली फोटोग्राफर, शेअर केला नवा PHOTO

टी-20साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

वाचा-धोनीबद्दल विराटनं निर्णय घ्यावा, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचा सल्ला

VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...