India vs South Africa : आज तुटणार सर्वात मोठा रेकॉर्ड, 4 वर्षांनंतर भारताला सूड घेण्याची संधी!

India vs South Africa : आज तुटणार सर्वात मोठा रेकॉर्ड, 4 वर्षांनंतर भारताला सूड घेण्याची संधी!

आज होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एका संघाचा एक रेकॉर्ड मोडणार आहे.

  • Share this:

मोहाली, 18 सप्टेंबर : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 वर्ल्ड कपआधी तीन सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान आतंरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यात जास्त लढती झाल्या नाही आहेत. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 13 टी-20 सामने झाले आहेत. यात भारतानं 8 तर दक्षिण आफ्रिका संघानं 5 सामने जिंकले आहेत. दरम्यान या दोन संघांमधील दोन सामने रद्द झाले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय भुमिवर आतापर्यंत एकही टी-20 सामना दक्षिण आफ्रिका संघानं गमावलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत केवळ दोन सामने भारतात झाले आहे. हे दोन्ही सामने भारतानं जिंकले होते.

टी-20 आतंरराष्ट्रीय : दक्षिण आफ्रिकेचा भारतात रेकॉर्ड

1. 2 ऑक्टोबर 2015: धर्मशाला- दक्षिण आफ्रिकानं 7 विकेटनं जिंकला सामना

2. 5 ऑक्टोबर 2015: कटक- दक्षिण आफ्रिकानं 6 विकेटनं जिंकला सामना

3. 8 ऑक्टोबर 2015: कोलकाता- मॅच रद्द

4. 15 सप्टेंबर 2019: धर्मशाला- मॅच रद्द

वाचा-आफ्रिकाविरोधात 4 वर्षांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा LIVE

दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना मोहालीच्या पीसीए आईएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मैदानात भारतानं आतापर्यंत एकही टी-20 सामना गमावला नाही आहे. 2009-2016 दरम्यान या मैदानात भारतानं दोन सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने भारतानं जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका विरोधात पहिल्यांदाच मोहाली मैदानात सामना होत आहे.

मोहालीमध्ये भारताचे रेकॉर्ड

1. 12 डिसेंब 2009: भारतानं श्रीलंकेला 6 विकेटनं नमवले.

2. 27 मार्च 2016: भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटनं नमवले.

वाचा-सामना आफ्रिकाविरुद्ध तयारी वर्ल्ड कपची! 'या' 11 खेळाडूंना कोहली देणार संघ जागा

चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा

दरम्यान आज दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ चार वर्षांनंतर भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे.

वाचा-दुसरा टी-20 पाहण्यासाठी आहात उत्सुक? पण त्याआधी जाणून घ्या मोहालीचे हवामान

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

First published: September 18, 2019, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading