India vs South Africa : सामना आफ्रिकाविरुद्ध तयारी वर्ल्ड कपची! 'या' 11 खेळाडूंना कॅप्टन कोहली देणार संघात जागा

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी-20 सामना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 02:34 PM IST

India vs South Africa : सामना आफ्रिकाविरुद्ध तयारी वर्ल्ड कपची! 'या' 11 खेळाडूंना कॅप्टन कोहली देणार संघात जागा

मोहाली, 18 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्याआधी तयारीसाठी सज्ज आहेत. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन टी-20 सामन्यांसाठी भारतात आला आहे. मात्र, या दोन्ही संघांमध्ये धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेला पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यामुळं 18 सप्टेंबरला दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे. धर्मशाला येथे पावसामुळं टॉस न होता सामना रद्द झाला. त्यामुळं आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे ते मोहाली येथील वातावरणावर. दरम्यान ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे.

तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

वाचा-India vs South Africa : दुसरा टी-20 पाहण्यासाठी आहात उत्सुक? पण त्याआधी जाणून घ्या मोहालीचे हवामान

या भारतीय खेळाडूंना संघात मिळणार स्थान

या टी-20 सामन्यात भारतीय संघात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांचे स्थान कायम राहिल. धवननं भारतीय अ संघाकडून चांगली कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला किंवा मनीष पांडे यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. श्रेयसनं वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. ऋषभ पंतचे स्थान कायम राहू शकते. तसेच, संघात कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा संघात असतील. गोलंदाजीमध्ये नवदीप सैनी, खलील अहमद आणि दीपक चाहर यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकते.

Loading...

वाचा-Under 19 Asia Cup गाजवणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूची विजय हजारे स्पर्धेत एण्ट्री!

असे असेल मोहालीचे हवामान

धर्मशालामध्ये निराशा मिळाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मोहालीच्या हवामानावर आहे. दरम्यान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 18 सप्टेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली नाही. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. त्यावेळी मोहालीचे तापमान 28 ते 31 डिग्री असू शकते. दरम्यान मॅच सुरू असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास 5 टक्के किंवा 10 टक्के पावसाची शक्यता आहे.

वाचा-धोनी काही कर पण पुढची मालिका खेळ! चाहत्यांची आर्तहाक, PHOTO VIRAL

भारताचा संभाव्य संघ-रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी.

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...