मोहाली, 18 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरोधात होत असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. युवा गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका संघाला 149 धावांवर रोखले. विराटनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघानं चांगली फलंदाजी केली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 31 धावा केल्या. त्यानंतर अखेर युवा गोलंदाज दीपक चहरनं भारताला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार क्विंटन डी कॉकसोबत चांगली फलंदाजी करणारा हेंड्रिक्स 3.5व्या ओव्हरमध्ये बाद झाला. या मालिकेत भारतीय संघानं पुढच्या वर्षी येणारा टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळं विराट कोहली काही काळ संतापला होता. श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांच्या ओव्हर थ्रोमुळं संघाला नुकसान सहन करावे लागले. मात्र विराट कोहलीचा अवतार पाहून मैदानावरील प्रेक्षकही अवाक् झाले.
सुपरमॅन बनला कॅप्टन कोहली
गोलंदाजी अडचणीत असताना कोहलीनं सुपरमॅन बनत संघाला मदत केली. कर्णधार क्विंटन डी कॉकनं आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याची आक्रमक फलंदाजी भारतासाठी धोकादायक ठरत होती. याचवेळी 12व्या ओव्हरमध्ये नवदीप सैनीच्या चेंडूवर विराट कोहलीनं डाईव्ह मारत कॅच घेतला. विराटनं आजूबाजूला कोणी फिल्डर नाही हे पाहते अगदी अखेरच्या क्षणात उडी मारत कॅच घेतला. या एका विकेटमुळं आफ्रिकेचा डाव 149वर आटपला.
वाचा-युवा ब्रिगेडनं दक्षिण आफ्रिकेला रोखलं! भारतासमोर 150 धावांचे आव्हान
जडेजानं केली कमाल
विराट कोहलीच्या या कॅचमुळं टीम इंडियावरचा दबाव काहीसा कमी झाला. त्यामुळं पुढच्या ओव्हरमध्ये जडेजानं आपल्या पहिल्याच चेंडूवर रासी वॉन दुसांला अप्रतिम कॅच घेत बाद केले. आजच्या सामन्यात केएल राहुल, मनीष पांडे, राहुल चहर आणि खलील अहमद यांना संघात जागा दिलेली नाही. तर, दक्षिण आफ्रिका संघाकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले.
वाचा-कोण मारणार बाजी? आफ्रिकाविरोधात नाही तर टीम इंडियात विक्रमांसाठी स्पर्धा!
चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा
तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.
वाचा-भारताच्या 'या' हॉट गोल्फपटूची जगात चर्चा, मॉडेलपेक्षा कमी नाही लुक!
VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय?आदित्य ठाकरेंनी केला हा गंभीर आरोप