India vs South Africa : टी-20चा थरार मिस करण्याचं टेंशन नको! JIOवर पाहू मोफत लाईव्ह सामना

India vs South Africa : टी-20चा थरार मिस करण्याचं टेंशन नको! JIOवर पाहू मोफत लाईव्ह सामना

मोफत लाईव्ह सामना पाहण्यासाठी टीव्ही नाही तर डॉऊनलोड करा JIO TV.

  • Share this:

मोहाली, 18 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मोहालीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यावर आहे. आज दुसरा टी-20 सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे.

दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे जर सामन्याच्या दरम्यान तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घराबाहेर असाल तरी काळजी करू नका. जर तुम्ही Jio ग्राहक असाल आणि तुमच्याकडे Jio TV हे अॅप असेल तर तुम्ही फोनवर हा सामना मोफत पाहू शकता.

एवढेच नाही तर लाईव्ह सामन्यात Jio Cricket Play Along गेम खेळून बक्षिसही जिंकू शकता. क्रिकेट चाहते Jio TVवर मोफत तीन टी-20 आणि तीन कसोटी सामने पाहू शकतात. सामना लाईव्ह पाहण्यासाठी तुमच्याकडे फक्त प्राईम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.

वाचा-India vs South Africa : दुसरा टी-20 पाहण्यासाठी आहात उत्सुक? पण त्याआधी जाणून घ्या मोहालीचे हवामान

Loading...

सामना लाईव्ह पाहण्यासाठी करा या गोष्टी

सामना लाईव्ह पाहण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून Jio TV अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर आपल्या Jio नंबरने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर Jio TV अॅपमध्ये Jio Cricket HD चॅनल दिसतील. या चॅनलवर तुम्ही भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाईव्ह सामना पाहू शकता.

वाचा-धोनी काही कर पण पुढची मालिका खेळ! चाहत्यांची आर्तहाक, PHOTO VIRAL

चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा

तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

वाचा-मॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव!

टी 20 साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 07:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...