मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: गुवाहाटीत होणार दक्षिण आफ्रिकेचं गर्वहरण? 'तो' रेकॉर्ड टीम इंडियाचं टार्गेट

Ind vs SA: गुवाहाटीत होणार दक्षिण आफ्रिकेचं गर्वहरण? 'तो' रेकॉर्ड टीम इंडियाचं टार्गेट

भारत वि. दक्षिण आफ्रिका दुसरी टी20

भारत वि. दक्षिण आफ्रिका दुसरी टी20

Ind vs SA: वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाकडे आता सरावासाठी दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 1 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला दुसरा टी20 सामना उद्या गुवाहाटीत खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघानं तिरुअनंतपूरमची पहिली वन डे जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुवाहाटीत जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा रोहित शर्माच्या टीम इंडियाचा प्रयत्न राहील. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा एक विक्रमही टीम इंडियाच्या रडारवर असेल. तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं भारतात आजवर एकही टी20 मालिका गमावलेली नाही. जर उद्या दक्षिण आफ्रिका गुवाहाटीत हरली तर दक्षिण आफ्रिकेचा भारतीय भूमीवर झालेला तो पहिला मालिका पराभव असेल.

अपराजित दक्षिण आफ्रिका

2015-16 च्या मोसमात दक्षिण आफ्रिकन संघ टी20 मालिका खेळण्यासाठी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेन ंती मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली होती. त्यानंतर 2019 आणि 2020 साली दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिका 1-1 आणि 2-2 अशा बरोबरीत राखल्या होत्या. त्यामुळे मालिका गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. पण यंदा दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकून न देण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरली आहे.

पहिल्या सामन्यात धूळदाण

तिरुअनंतपूरमच्या पहिल्या टी20त भारतीय आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी लोटांगणच घातलं. अर्शदीप आणि दीपक चहरच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा डाव 2.3 ओव्हरमध्येच माघारी परतला होता. पण केशव महाराज, वेन पार्नेल आणि एडन मार्करमच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला 106 धावांची मजल मारता आली. पण त्यानंतर सूर्यकुमार आणि लोकेश राहुलच्या अभेद्य भागीदारीनं टीम इंडियाला तब्बल 8 विकेट्सनी विजय मिळवून दिला होता.

गुवाहाटीत भारतीय संघात बदल?

वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाकडे आता सरावासाठी दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. बुमराऐवजी संघात सामील केलेल्या मोहम्मद सिराजला संधी मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर बॅटिंग लाईन अपमध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळणार का? हाही प्रश्न आहे.

भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी टी20

बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

2 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.00 वाजता

स्टार स्पोर्टस, डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण

हेही वाचा - T20 World Cup: कोच राहुल द्रविडनंही बुमराबाबत दिली मोठी अपडेट, म्हणाला 'बुमरा फक्त...'

भारतीय टी20 संघ –रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ - तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, T20 world cup 2022, Team india