मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: गुवाहाटीत टीम इंडिया करणार पहिल्यांदा बॅटिंग, पाहा रोहितची दुसऱ्या टी20साठीची प्लेईंग XI

Ind vs SA: गुवाहाटीत टीम इंडिया करणार पहिल्यांदा बॅटिंग, पाहा रोहितची दुसऱ्या टी20साठीची प्लेईंग XI

भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20

भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20

Ind vs SA: भारतीय संघानं तिरुअनंतपूरमची पहिली टी20 जिंकून तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकाविजयाच्या निर्धारानं गुवाहाटीच्या मैदानात भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 2 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्यांदा मालिकाविजयाची संधी टीम इंडियाकडे आहे. भारतीय संघानं तिरुअनंतपूरमची पहिली टी20 जिंकून तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकाविजयाच्या निर्धारानं गुवाहाटीच्या मैदानात भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मानं संघात एकही बदल केलेला नाही.

भारतीय प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, दीपक चहर, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल

गुवाहाटीत पावसाचा खेळ?

भारतीय संघ दोन वर्षांनी गुवाहाटीत टी20 सामना खेळत आहे. याआधी 2020 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला होता. त्यामुळे तो सामना एकही बॉल न खेळताच रद्द झाला होता. त्यामुळे आज गुवाहाटीत पुन्हा पावसामुळे खेळ बिघडून नये अशी अपेक्षा क्रिकेट चाहते करत आहेत. पण हवामान खात्यानं  वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्री पाऊस पडण्याची जास्त चिन्ह आहेत.

स्टेडियममध्ये आधीच तयारी

पाऊस पडून गेला तरी खेळ सुरु करण्यासाठी यावेळी आसाम क्रिकेट असोसिएशननं खास तयारी केली आहे. 2020 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी ओली असल्यानं सामना होऊ शकला नाही. त्यावेळी पीच सुकवण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण अखेरीस सामना रद्द करावा लागला. त्यामुळे यावेळी मात्र आयोजकांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे.

टीम इंडियाची नजर मालिकाविजयावर

टीम इंडियानं जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आजचा सामना जिंकला तर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर मायदेशात मिळवलेला  हा पहिलाच मालिकाविजय असेल. कारण दक्षिण आफ्रिकेनं भारतात एकही मालिका गमावलेली नाही. 2015-16 साली दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या तीन मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं एक जिंकली आहे तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, T20 cricket, Team india