India vs South Africa : कॅच का बदला कॅचसे! मिलर की विराट कोण भारी तुम्हीच ठरवा

India vs South Africa : कॅच का बदला कॅचसे! मिलर की विराट कोण भारी तुम्हीच ठरवा

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात विराट आणि मिलरच्या कॅचची चर्चा सुरू आहे.

  • Share this:

मोहाली, 18 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रंजक झाल आहे. भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अपयशी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटाकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेला युवा गोलंदाजांनी 149 धावांवर रोखले.

दरम्यान, आफ्रिकेनं दिलेल्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखऱ धवन यांनी चांगली सुरुवात केली. 4 ओव्हरमध्ये 33 धावांची भागिदारी या दोन्ही फलंदाजांनी केली, यात रोहित शर्मानं दोन उत्कृष्ठ षटकार लगावले. मात्र फेहलुकवायोनं आपल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माला बाद केले. शर्मा 12 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटची अडखळत सुरुवात झाली. मात्र त्यानंतर धवन आणि कोहलीनं 51 धावांची भागिदारी केली.

शिखर धवन चांगल्या लयीत असताना मिलरनं सीमारेषेजवळ उत्कृष्ठ झेल घेतला. या झेल पाहून प्रेक्षकच नाही तर विराट आणि धवनही आवाक् झाले. काही सेकंद कोणालाच कळले नाही काय झाले. शिखर धवन 40 धावांवर बाद झाला. मात्र मिलरनं एका हातानं पकडलेला कॅच हा पहिल्या डावात विराटनं पकडलेल्या कॅचला टक्कर देणारा होता.

सुपरमॅन बनला कॅप्टन कोहली

गोलंदाजी अडचणीत असताना कोहलीनं सुपरमॅन बनत संघाला मदत केली. कर्णधार क्विंटन डी कॉकनं आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याची आक्रमक फलंदाजी भारतासाठी धोकादायक ठरत होती. याचवेळी 12व्या ओव्हरमध्ये नवदीप सैनीच्या चेंडूवर विराट कोहलीनं डाईव्ह मारत कॅच घेतला. विराटनं आजूबाजूला कोणी फिल्डर नाही हे पाहते अगदी अखेरच्या क्षणात उडी मारत कॅच घेतला. या एका विकेटमुळं आफ्रिकेचा डाव 149वर आटपला.

दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात युवा ऋषभ पंतनं पुन्हा निराशा केली. पंत पुन्हा एकदा बेजबाबदार शॉट खेळून केवळ 4 धावा करत बाद. त्यामुळं आता संघाची धुरा कर्णधार कोहलीवर आहे. कोहलीनं आपले 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे हे 22वे अर्धशतक आहे. याचबरोबर कोहली सर्वात जास्त अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे.

VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय?आदित्य ठाकरेंनी केला हा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 10:12 PM IST

ताज्या बातम्या