India vs South Africa : '...तर काही वर्षांआधीच मी ओपनिंग केली असती', रोहित शर्मानं केला गौप्यस्फोट

India vs South Africa : '...तर काही वर्षांआधीच मी ओपनिंग केली असती', रोहित शर्मानं केला गौप्यस्फोट

पहिल्या कसोटी सामन्यात 303 धावा करणाऱ्या रोहितला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

  • Share this:

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजयी आघाडी मिळवली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवला आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही भारतानं आपला दबदबा कायम राखत पहिले स्थान मिळवले आहे. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मानं 303 धावा करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. याआधी भारतानं वेस्ट इंडिज विरोधात मालिका विजय मिळवला होता.

सलामीचा फलंदाज म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्मानं 303 धावा केल्या. यात रोहितनं पहिल्या डावात 176 धावांची तर दुसऱ्या डावात 127 धावांची तुफानी खेळी केली. यासह टी-20चा बादशाह कसोटीमध्येही आपलं रंग दाखवू शकला आहे. रोहित शर्मानं आपल्या दोन डावांमध्ये 13 षटकार लगावले आहेत. कसोटी सामन्यात एवढे षटकार लगावणारा रोहित पहिला फलंदाज आहे.

रोहितनं सामनावीराचा पुरस्कार मिळवत एक गौप्यस्पोट केला. रोहितनं आपल्या खेळीबाबत समाधान व्यक्त करत, “मला फक्त फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करायची होती. सलामीच्या संधीमुळं मी खुश आहे. सामना जिंकण्यासाठी सांघिक खेळ महत्त्वाचा होता. आम्ही सुध्दा तेच केलं, त्यामुळं हे यश मिळाले”, असे मत व्यक्त केले.

वाचा-टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

वर्षभराआधीच सलामीला खेळायची संधी होती.

सामनावीर रोहित शर्मानं, “काही वर्षांपूर्वी मला सलामीला फलंदाजी करायला मिळेल असे ऐकले होते. त्यामुळं मी नेटमध्येही नवीन बॉलनं सराव करायचो. त्यामुळं आजच्या सामन्यात फलंदाजी करताना चिंता नव्हती”, असे सांगत अनेक विक्रमांना आपल्या खिशात घालणाऱ्या रोहितचे चहुबाजूंनी कौतुक होत आहे. “माझे ध्येय खेळाची मजा घेत खेळणं असते. संघाला मजबूत स्थितीत पोहचवणे हे माझे काम असते. काही शॉट खेळण्याची गरज होती, ते मी केलं. मला रेकॉर्ड्स नाही माहीत, मी फक्त खेळण्यावर लक्ष देतो”, असेही रोहितनं सांगितले.

द वॉलला टाकले मागे

एकाच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतकी कामगिरी करणारा रोहित 17वा फलंदाज आहे. रोहितनं मायदेशात आतापर्यंत 7 अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. यासह रोहितनं राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुल द्रविडनं 6वेळा अर्धशतकी कामगिरी केली आहे.

वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह

रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितनं या सामन्यात एकूण 13 षटकार लगावले. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 7 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. तसेच, याआधी पाकिस्तानच्या वसीम अक्रमनं एका कसोटी सामन्यात 12 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या