पुन्हा रो'हिट'! टी-20च्या बादशाहाची कसोटीतही दमदार एण्ट्री

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह असलेल्या रोहितची कसोटी क्रिकेटमध्ये दणक्यात सुरुवात.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 11:39 AM IST

पुन्हा रो'हिट'! टी-20च्या बादशाहाची कसोटीतही दमदार एण्ट्री

विशाखापट्टणम, 02 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीला फलंदाज केली. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मानं पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी केली. मात्र रोहित चांगल्या लयीत दिसत आहे. रोहितनं आपल्या 84 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहितचे कसोटी क्रिकेटमधले हे 11वे अर्धशतक आहे. रोहितची ही सलामीचा फलंदाज म्हणून पहिले अर्धशतक आहे.

भारताकडून तब्बल 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. याआधी 100हून अधिक सामन्यात सलामीला फलंदाजी केलेल्या रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये ही संधी मिळाली नाही. मात्र दक्षिण आफ्रिका विरोधात रोहित चांगल्या लयीत दिसला. या सामन्यात रोहितनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपल्या खेळाचा शुभारंभ केला. त्यामुळं टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह कसोटीमध्येही आपले पाय रोवत आहे. लंच ब्रेकपर्यंत भारतानं 91-0पर्यंत मजल मारली आहे. यात रोहितनं 52 तर मयंकने 39 धावा केल्या आहेत. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी संयमी सुरुवात केली आहे.

चौका मारत केली खेळीची सुरुवात

एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणारा रोहित कसोटीमध्येही आपली कमाल दाखवत आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच रोहितनं राबाडाच्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार लगावला. त्यामुळं जवळजवळ वर्षानंतर कसोटी खेळणाऱ्या रोहितनं टी-20 एकदिवसीय क्रिकेट पाठोपाठ आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

Loading...

रोहितवर मोठी जबाबदारी

केएल राहुलच्या खराब फॉर्ममुळं रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका विरोधात संघा स्थान मिळाले. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये रोहितनं मधल्या फळीत फलंदाजी केल आहे. त्यामुळं सलामीला पहिल्यांदाच उतरलेल्या रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

असा आहे भारताचा संघ- विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...