ऋषभ पंत पाठोपाठ आणखी एका युवा खेळाडूचा विराटनं केला पत्ता कट!

ऋषभ पंत पाठोपाठ आणखी एका युवा खेळाडूचा विराटनं केला पत्ता कट!

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 01 ऑक्टोबर : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. विशाखापट्टणम येथे या दोन्ही देशांमध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. यासाठी कर्णधार विराट कोहलीनं आपली सर्व प्लॅनिंग पूर्ण केली आहे. कोहली सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांची जोडी सज्ज केली आहे.

सामन्याआधी विराटनं कोणत्या अकरा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे याबाबत सांगितले. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतला आफ्रिकाविरोधात डच्चू देण्यात आला. त्याच्याजागी वृध्दीमान साहाला संघात स्थान दिले आहे. दरम्यान फक्त ऋषभ पंतच नाही तर विराटनं आणखी एका युवा खेळाडूला डच्चू दिला आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात होत असलेल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी जोडी मैदानात दिसणार आहे. त्यांच्यासोबत अष्टपैलु खेळाडू हनुमा विहारी तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून चालू शकतो. त्यामुळं कुलदीप यादवला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याआधी वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात अश्विन आणि कुलदीप यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

वाचा-अखेर ऋषभला डच्चू! आफ्रिका विरोधात 'या' खेळाडूला मिळाली संधी

घरच्या मैदानावर दोन फिरकी गोलंदाज फायद्याचे

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनं, "अश्विन आणि जडेजा दोघही या मालिकेची सुरुवात करतील. सध्या जडेजा चांगल्या स्थितीत आहे. विदेशी आणि मायदेशात जडेजाची सर्वोत्तम खेळी संघासाठी फायद्याची आहे. त्यचबरोबर अश्विन हा विरोधी संघासाठी नेहमीच धोक्याचा आहे. त्यामुळं अश्विन आणि जडेजा असे कॉम्बिनेशन आम्ही या मालिकेत वापरून पाहणार आहोत", असे सांगितले.

उमेश यादवलाही संघात जागा नाही

पाठीच्या दुखापतीमुळं याआधी माघार घेतलेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी संघात उमेश यादवला जागा मिळाली होती. मात्र अकरा खेळाडूंच्या संघात यादवचा पत्त कट करण्यात आला आहे. त्यामुळं भारताकडून मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे दोन जलद गोलंदाज असतील.

वाचा-बुमराहच्या दुखापतीने वाढली चिंता, BCCI ने घेतला मोठा निर्णय

रोहित आणि मयंक असणार सलामीचे फलंदाज

आफ्रिका विरोधात रोहित आणि मयंक सलामीला येणार आहेत. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये 47 वर्षांनंतर नवीन खेळाडू फलंदाजी करतील. मायदेशात मयंकनं किंवा रोहितनं एकाही सामन्यात सलामीला फलंदाजी केलेली नाही. त्यामुळं दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दोघे नवखे फलंदाज सलामीला उतरतील.

असा आहे भारताचा संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

वाचा-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळा नाहीतर बाहेर बसा, भारताच्या 5 खेळाडूंची खरी 'कसोटी'

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Published by: Akshay Shitole
First published: October 1, 2019, 4:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading