India vs South Africa : वादळाचं दुसरं नाव मोहम्मद शमी! 5 विकेटसह 'या' विक्रमांवर कोरले नाव

India vs South Africa : वादळाचं दुसरं नाव मोहम्मद शमी! 5 विकेटसह 'या' विक्रमांवर कोरले नाव

शमीनं दुसऱ्या डावात पाच विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

  • Share this:

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात भारतानं 203 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूनं आपले योगदान दिले. पहिल्या डावात रोहित आणि मयंकनं चांगली कामगिरी केली तर त्यानंतर गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. भारतानं दिलेल्या 394 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना संघर्ष करू दिला नाही. याच सर्वात महत्त्वाची कामगिरी केली ती मोहम्मद शमीनं. शमीनं दुसऱ्या डावात पाच विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

मोहम्मद शमीला या सामन्यातील पहिल्या डावात एकही विकेट घेता आली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात शमीनं पाच विकेट घेतल्या. याशिवाय शमीनं गोलंदाजीमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान सामन्यात शमीनं घेतलेल्या विकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते इनस्विंने. 21व्या ओव्हरमध्ये शमीनं कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसची शानदार गोलंदाजी करत विकेट घेतली. शमीच्या उत्कृष्ठ इनस्विंगवर फाफ बोल्ड झाला. शमीनं आतापर्यंत 43 कसोटी सामन्यात 158 विकेट घेतल्या आहेत. यातील सर्वात जास्त विकेट या फलंदाजाला बोल्ड करून घेतल्या आहेत.

वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

आफ्रिका विरोधात दुसऱ्या डावात पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज

मोहम्मद शमी जगातला असा पहिला गोलंदाज ठरला आहे ज्यानं दक्षिण आफ्रिका विरोधात दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या आहेत. शमीच्या आधी अशी कामगिरी कोणत्याच गोलंदाजाला करता आली नाही. विशाखापट्टणम झालेल्या या कसोटी सामन्यात शमीनं तेंबा बावुमा, फाफ ड्यु प्लेसिस, क्विंटन डी कॉक, डेन पीड आणि रबाडा यांना आऊट केले.

वाचा-'...तर काही वर्षांआधीच मी ओपनिंग केली असती', रोहित शर्मानं केला गौप्यस्फोट

मायदेशाच पाच विकेट घेणारा पाचवा गोलंदाज

दक्षिण आफ्रिका विरोधात पाच विकेट घेत शमीनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. मायदेशात पाच विकेट घेणारा शमी पाचवा फलंदाज ठरला आहे. शमीच्याआधी पाच गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

पाच विकेटमध्ये चार फलंदाजांना केले बोल्ड

मोहम्मद शमीनं या सामन्यात पाच विकेट घेतल्या, यातील चार विकेट या फलंदाजांना क्लीन बोल्ड करत घेतल्या. अशीच कामगिरी वेस्ट इंडिज विरोधात जसप्रीत बुमराहनं केली होती. शमीनं दुसऱ्या डावात तेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, डेन पीड आणि फाफ ड्यु प्लेसिस यांना क्लीन बोल्ड केले.

वाचा-अरे देवा! विक्रमांचा डोंगर उभारणाऱ्या रोहितनं केला एक लाजीरवाणा विक्रम

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या