India vs South Africa 1st Test Day 1 : रोहित शर्माच्या शतकानंतर पावसाची एण्ट्री, पहिल्या दिवसाचा खेळ संपला

India vs South Africa 1st Test Day 1 : रोहित शर्माच्या शतकानंतर पावसाची एण्ट्री, पहिल्या दिवसाचा खेळ संपला

पावसामुळं पहिल्या दिवसाचा खेळ चहापान्यापर्यंत खेळवण्यात आला.

  • Share this:

विशाखापट्टणम, 02 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीची निर्णय घेतला. दरम्यान रोहित शर्माच्या शतकासह पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. विशाखापट्टणम येथे पावासाचा जोर वाढल्यामुळं खेळ रद्द करण्यात आला. दरम्यान भारतानं 59.1 ओव्हरमध्ये 202 धावा केल्या आहेत.

पहिल्यांदा कसोटीमध्ये सलामीला उतरलेल्या जोडीनं शानदार कामगिरी केली. रोहित शर्मानं शतकी खेळी केली तर मयंक अग्रवालनं अर्धशतकी खेळी करत शतकाकडे वाटचाल केली आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ चहापानपर्यंत आला तेव्हा उजेड नसल्यामुळं खेळ लवकर बंद करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यामुळं खेळ पुन्हा सुरू झाला नाही. त्यामुळं चायपानानंतर खेळ थांबवण्यात आला. सध्या मैदानावर रोहित शर्मा 115 तर मयंक अग्रवाल 84 धावांवर खेळत आहे.

वाचा-कसोटीमध्येही रोहितचा टी-20 अवतार! झळकावलं शानदार शतक

वाचा-पुन्हा रो'हिट'! टी-20च्या बादशाहाची कसोटीतही दमदार एण्ट्री

रोहित शर्माचे शतक

टी-20मधला हिटमॅन आता कसोटीमध्येही आपली जादू दाखवत आहे. ओपनर म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्मानं शतकी कामगिरी करत अनेक रेकॉर्ड आपल्या खिशात घातले आहेत. विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या सामन्यात रोहितनं 154 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करून रोहितनं शतक झळकावताना सर्वात जास्त षटकार लगावले आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की, सलामीला पदार्पण करणाऱ्या खेळाडूनं शतकी खेळी करण्यासाठी 4 षटकार लगावले आहे.

वाचा-सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 09:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading