घरच्या मैदानांवर कॅप्टन कोहलीच किंग! बॅटींग रेकॉर्ड पाहून व्हाल थक्क

घरच्या मैदानांवर कॅप्टन कोहलीच किंग! बॅटींग रेकॉर्ड पाहून व्हाल थक्क

विराटचा मायदेशात रेकॉर्ड तगडा आहे. त्यानं 64.68च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

  • Share this:

विशाखापट्टणम, 02 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला कसोटी सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा आहेत त्या कर्णधार विराट कोहलीवर. पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघात मोठे बदल केले आहेत. ऋषभ पंत आणि उमेश यादव यांना विश्रांती देत, वृध्दीमान साहाला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते विराट कोहलीवर. कारण विराटचा मायदेशात रेकॉर्ड तगडा आहे. त्यानं 64.68च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

विराटनं घरच्या मैदानावर एकूण 34 कसोटी सामने खेळले आहेत. यात 3 हजार 105 धावा केल्या आहेत. यात कोहलीच्य नावावर एकूण 11 शतक आहेत. मायदेशात 3 हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये कोहलीची सरासरी सर्वात जास्त आहे. यात डॉन ब्रॅडमन अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत. ब्रॅडमन यांनी मायदेशातील 33 कसोटी सामन्यात 98.22च्या सरासरीनं 4 हजार 322 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या नावावर 18 शतक आहेत.

वाचा-ऋषभ पंत पाठोपाठ आणखी एका युवा खेळाडूचा विराटनं केला पत्ता कट!

दुसऱ्या क्रमांकावर आहे स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज स्टिव्ह स्मिथ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 29 कसोटी सामन्यात 77.25च्या सरासरीनं 3 हजार 75 धावा केल्या आहेत. तर दिग्गज फलंदाज गॅरी सोबर्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गॅरी यांनी मायदेशात खेळलेल्या 44 कसोटी सामन्यात 66.80च्या सरासरीनं 4 हजार 075 धावा केल्या आहेत. यात 14 शतकांचा समावेश आहे. या यादीत पाकिस्तानच्या मोहम्मद यूसुफनंतर पाचव्या क्रमांकावर विराट कोहलीचा क्रमांक आहे.

विराटनंतर या यादीत पुजाराचा क्रमांक

कसोटी क्रिकेटमधला सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणजे पुजारा. पुजारानं भारतात खेळलेल्या 36 कसोटी सामन्यात 3 हजार 217 धावा केल्या आहेत. यात 10 शतकांचा समावेश आहे.

वाचा-बुमराहच्या दुखापतीने वाढली चिंता, BCCI ने घेतला मोठा निर्णय

भारताला जिंकावी लागेल मालिका

भारतीय संघ 2 ऑक्टोबरपासून अफ्रिका विरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेत विराटसेनेला एक पराभवही महागात पडू शकतो. जगातील नंबर 1 कसोटी संघ असलेल्या भारतीय संघाचे स्थान धोक्यात आले आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यात फक्त मालिकेत विजय मिळवण्याची नाही तर कसोटी रँकिंगमध्ये पाहिले स्थान मिळवण्याची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे जर भारताने मालिका गमावली तर दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल.

वाचा-'धोनीच्या एका जागेसाठी 27 विकेटकिपरसोबत असते गळेकापू स्पर्धा'

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 08:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading