47 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये घडणार वेगळा प्रकार, टीम इंडियाच्या नावावर अनोखा विक्रम

47 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये घडणार वेगळा प्रकार, टीम इंडियाच्या नावावर अनोखा विक्रम

2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका विरोधात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिका विरोधात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2 ऑक्टोबरपासून या मालिकेची सुरुवात विशाखापट्टणम येथे होणार आहे. याआधी झालेली टी-20 मालिका 1-1नं बरोबरीत संपली. दरम्यान दक्षिण आफ्रिका विरोधात होणारी ही कसोटी मालिका भारतासाठी खास असणार आहे. मुख्य म्हणजे चार वर्षांनंतर भारत आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेविरोधात कसोटी मालिका खेळणार आहे. तर, दुसरीकडे कसोटीमधले आपले पहिले स्थान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला मेहनत करावी लागणार आहे. असे असले तरी सलामीला कोण फलंदाजी करणार याबाबत अजूनही साशंकता कायम आहे.

निवड समितीनं दक्षिण आफ्रिकाविरोधात संघात मोठे बदल करत केएल राहुल ऐवजी रोहित शर्माला संघात स्थान दिले. त्यामुळं रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करण्यात उतरू शकतो. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितला एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तर, आफ्रिका विरोधात झालेल्या सराव सामन्यात रोहित शुन्यावर बाद झाला. असे असले तरी, मयंक अग्रवालसोबत रोहितला सलामीचा संधी दिली जाऊ शकते.

वाचा-सराव सामन्यात रोहित शर्मा झाला ‘झिरो’, तर दुसरीकडे राहुल ठरला ‘हिरो’!

दरम्यान, रोहित आणि मयंक यांनी सलामीला पाठवल्यास कसोटी क्रिकेटमध्ये 47 वर्षांनंतर नवीन खेळाडू फलंदाजी करतील. मायदेशात मयंकनं किंवा रोहितनं एकाही सामन्यात सलामीला फलंदाजी केलेली नाही. त्यामुळं दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दोघे नवखे फलंदाज सलामीला उतरतील.

वाचा-‘तू तुझ्याच स्टाईलनं खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं रोहितला दिली वॉर्निंग

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह कसोटीत मात्र फेल

याआधी रोहित बोर्ड प्रजिडेंट इलेव्हन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय सराव सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. दुसऱ्याच चेंडूवर आपलं खात न उघडता रोहित बाद झाला.वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळं रोहितचे एकदिवसीय आणि टी-20 मधले रेकॉर्ड पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे रोहितनं 218 एकदिवसीय सामन्यात 8 हजार 686 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडे रोहितनं केवळ 27 कसोटी सामने खेळले आहेत. यात 1 हजार 585 धावा केल्या आहेत. 177ही कसोटी क्रिकेटमधली रोहितची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

वाचा-रोहितसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद! दुहेरी शतकांच्या बादशाहला झालयं तरी काय?

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

Published by: Priyanka Gawde
First published: September 30, 2019, 7:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading