'या’ भारतीय खेळाडूनं टीम इंडिया विरोधात केलं दुसऱ्या देशाकडून पदार्पण!

'या’ भारतीय खेळाडूनं टीम इंडिया विरोधात केलं दुसऱ्या देशाकडून पदार्पण!

एक भारतीय खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या देशाविरोधात खेळताना दिसला.

  • Share this:

विशाखापट्टणम, 03 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात सलामीच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवशी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्या 202 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं दणक्यात सुरुवात केली. मात्र या सामन्यात एक अजब प्रसंग घडला. एक भारतीय खेळाडू आपल्या संघाविरोधात खेळताना दिसला.

भारतीय मुळाचा सेनुरान मुथुस्वामी यानं दक्षिण आफ्रिकाविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. सेनुरान याचे आंतरराष्ट्रीक क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र सेनुरानला भारताकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही याचे दु:ख मात्र आहे. सेनुरानची पहिली पिढी तमिळनाडूमध्ये राहत होती, त्यानंतर संपूर्ण कुटुंब आफ्रिकेतील डर्बन येथे स्थायिक झाले. 25 वर्षीय सेनुरान दक्षिण भारतीय परिवारातील असून गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका ए संघाकडून खेळताना तो भारतात पहिल्यांदा आला होता.

वाचा-क्रिकेटपटूंसाठी BCCIने उचललं कठोर पाऊल, खोटं बोलून करू शकत नाही ‘हे’ काम

आपल्या पदापर्णात सेनुरानला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र पीटीआयशी बोलताला सेनुराननं, “आम्ही मुळ चेन्नईचे आहोत. माझ्या घरातील काही लोक आजही नागापत्तनममध्ये आहेत”, असे सांगितले. सेनुराननं दक्षिण आफ्रिकेतच आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र भारताविरोधात खेळताना सेनुराननं, “माझ्या घरच्यांना माझी निवड भारताविरोधात झाली आहे हे कळलं तेव्हा त्यांना खुप आनंद झाला. भारताविरोधात पदार्पण माझ्यासाठी खास आहे”, असे मत व्यक्त केले.

दरम्यान सेनुराननं मुळचा तमिळनाडूचा असला तरी त्याला तमिळ भाषा बोलता येत नाही. मुथुस्वामीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 32.27च्या सरासरीनं 3403 धावा केल्या आहेत. तर, 129 विकेट घेतल्या आहेत. याआधी त्यानं भारत अ संघाविरोधात सामने खेळले होते.

वाचा-सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

क्रिकेटव्यतिरिक्त योगामध्येही आहे सेनुराननंला यश

मुथुस्वामीला भारतीय खेळाडूंपेक्षा श्रीलंकेचे खेळाडू जास्त आवडतात. कुमार संगाकारा आणि रंगना हेरथ हे त्याचे आवडते खेळाडू आहेत. एवढेच नाही तर सेनुराननं मंदिरात जाणे आणि योगा करणे याची विशेष आवड आहे. फिरकी गोलंदाज असलेल्या सेनुराननं भारतात फिरकी गोलंदाजी करताना मजा येते पण भारतीय खेळाडू चिवट असल्यामुळं मेहनत जास्त करावी लागते असे मत व्यक्त केले.

वाचा-पाक कर्णधार सरफराजनं स्वीकारलं धोनीचं शिष्यत्व, युझरनी घेतली मजा

VIDEO : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, उमेदवारीसाठी थेट रास्ता रोको

Published by: Priyanka Gawde
First published: October 3, 2019, 7:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading