India vs South Africa Day 3 : भारताविरोधात आफ्रिकेचा 'एल्गार', टीम इंडियाकडे 117 धावांची आघाडी

India vs South Africa Day 3 : भारताविरोधात आफ्रिकेचा 'एल्गार', टीम इंडियाकडे 117 धावांची आघाडी

एल्गर आणि डी कॉकनं सावरला दक्षिण आफ्रिकेचा डाव. तर अश्विननं घेतल्या 5 विकेट.

  • Share this:

विशाखापट्टणम, 04 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डीन एल्गरनं आफ्रिकेला चांगल्या स्थितीत पोहचवले. दुसऱ्या दिवशी एका पाठोपाठ गेलेल्या तीन विकेटनंतर बॅकफुटवर गेलेला आफ्रिकेचा संघ एल्गारच्या 160 धावांनी पुन्हा चांगल्या स्थितीत पोहचला. तिसऱ्या दिवसा अंती आफ्रिकेनं 8 बाद 385 धावा केल्या. भारताकडे अजूनही 117 धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना आफ्रिकेच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही. एल्गर आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसिस यांच्या भागिदारीमुळं आफ्रिकेचा संघ चांगल्या स्थितीत पोहचला. फाफ आणि एल्गर यांनी पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागिदारी केली. आर. अश्विननं 55 धावांवर फाफला बाद केले. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि एल्गर यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात आफ्रिकेच्या या दोन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. एल्गर आणि डी कॉक यांच्यात 150 धांवांची भागिदारी झाली.

दरम्यान भारताला ज्या गोष्टीची गरज होती ती विकेट जडेजानं मिळवून दिली. जडेजाच्या चेंडूवर डीन एल्गरचा झेल मिड विकेटवर उभा असलेल्या चेतेश्वर पुजारानं झेलला. एल्गर 18 चौकार, 4 षटकार लगावत 160 धावा करत बाद झाला. त्यानंतर अश्विननं क्विंटन डी कॉकला 111 धावांवर बाद केले. अश्विननं या 5 विकेट पूर्ण केल्या तर जडेजानं 2 विकेट घेतल्या.

8 वर्षांनंतर एल्गरने केली ऐतिहासिक कामगिरी

दुसऱ्या दिवशी 27 धावा केलेल्या एल्गरनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एल्गरनं 112 चेंडूवर 6 चौकार आणि 1 षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच 175 चेंडूत शतकी खेळी केली. दरम्यान 2010नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतात कसोटीमध्ये शतकी खेळी केली आहे. 2009मध्ये हाशिम अमलानं भारताविरोधात शतकी खेळी केली होती.

जडेजानं पूर्ण केल्या 200 विकेट

रवींद्र जडेजानं सर्वात महत्त्वपूर्ण अशा एल्गरला बाद करत आपल्या कसोटी करिअरमधल्या 200 विकेट पूर्ण केल्या. जडेजानं लेफ्ट आर्म स्पिनर असूनही ही केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. जडेजानं 44 सामन्यात 200 विकेट घेण्याची कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी जडेजानं 2 विकेट घेतल्या.

VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

Published by: Priyanka Gawde
First published: October 4, 2019, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading