रोहित पाठोपाठ मयंक अग्रवालचे शतक, दक्षिण आफ्रिकेची दमछाक!

रोहित पाठोपाठ मयंक अग्रवालचे शतक, दक्षिण आफ्रिकेची दमछाक!

भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 50 अशी झाली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 03 ऑक्टोबर :दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचे दीडशतक आणि मयंक अग्रवालचे द्विशतक याच्या जोरावर भारताने पहिला डाव 502 धावांवर घोषित केला. अखेरच्या क्षणी रविंद्र जडेजाने ऋद्धिमान साहाला साथीला घेऊन फटकेबाजी केल्यानं संघाची धावसंख्या पाचशेच्या वर पोहोचली. भारतानं डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फंलदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. आर अश्विनने एडन मार्करमचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर थेइनिस ब्रुनला बाद केलं. तर जडेजाने डेन पिएटचा त्रिफळा उद्धस्त करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा दणका दिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेच्या 3 बाद 50 धावा झाल्या होत्या. भारताकडे पहिल्या डावात 463 धावांची आघाडी आहे.

तत्पूर्वी, पहिल्या दिवसाच्या बिनबाद 202 धावसंख्येवरून पुढे खेळताना रोहित शर्मा 176 धावांवर बाद झाला तर मयंक अग्रवाल 215 धावा करून बाद झाला. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला. विराट कोहली 20 तर केएल राहुल 15 धावा करू शकले. हनुमा विहारीला 10 धावा करता आल्या. शेवटी रविंद्र जडेजा आणि ऋद्धिमान साहाने संघाला 500 धावांचा टप्पा पार करून दिला. जडेजाने नाबाद 30 धावांची खेळी केली.

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानतंर मयंक अग्रवालने कसोटीतील त्याचं पहिलं शतक साजरं केलं. मयंक अग्रवालने याआधी भारताबाहेर कसोटी खेळल्या होत्या. त्यानं मायदेशातील पहिल्याच कसोटीत शतक साजरं केल्यानं ते खास ठरलं आहे. त्यानं आतापर्यंत अर्धशतकं केली होती पण शतकी मजल मात्र गाठता आली नव्हती.

मयंक अग्रवालने या सामन्यात 204 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार खेचले. याआधी त्याच्या नावावर तीन अर्धशतकं आहेत. मयंकने पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यातही त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. डिसेंबर 2018 मध्ये त्यानं पदार्पण केलं होतं. त्याला वर्ल्ड कपमध्ये बदली खेळाडू म्हणूनही संघात घेतलं होतं. मात्र, खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे 59.1 षटकांनंतर थांबवण्यात आला होता. भारताने पहिल्या दिवशी बिनबाद 202 धावा केल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा 115 धावांवर तर मयंक अग्रवाल 84 धावांवर नाबाद होते.

आम्हालाही भावना आहे? मेधा कुलकर्णींचं भावुक UNCUT भाषण

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 5:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading