IND vs SA, 1st Test LIVE : केएल राहुलचं झुंजार शतक, भारत मजबूत स्थितीमध्ये

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa 1st Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

 • News18 Lokmat
 • | December 26, 2021, 20:09 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:54 (IST)

  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची दणक्यात सुरूवात. दिवसाअखेरपर्यंत भारताचा स्कोअर 272/3. केएल राहुल 122 रनवर नाबाद, तर अजिंक्य रहाणे 40 रनवर मैदानात. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने घेतल्या तिन्ही विकेट. मयंक अग्रवाल 60 रनवर, चेतेश्वर पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आणि विराट कोहली 35 रनवर आऊट.

  20:3 (IST)

  केएल राहुलचं शानदार शतक, 218 बॉलमध्ये 14 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने झळकावली सेंच्युरी. भारताचा स्कोअर 238/3.

  19:22 (IST)

  विराट कोहली 35 रन करून आऊट, लुंगी एनगिडीला मिळाल्या तिन्ही विकेट, भारताचा स्कोअर 203/3

  18:21 (IST)

  पहिल्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताचा स्कोअर 157/2, केएल राहुल 68 रनवर तर विराट कोहली 19 रनवर नाबाद. दुसऱ्या सत्रात भारताने मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. मयंक 60 रनवर तर पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट. लुंगी एनगिडीने लागोपाठ दोन बॉलला घेतल्या दोन विकेट.

  17:8 (IST)

  भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट. एनगिडीला लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट

  17:6 (IST)

  भारताला पहिला धक्का, मयंक अग्रवाल 60 रनवर आऊट, लुंगी एनगिडीने घेतलं एलबीडब्ल्यू. भारताचा स्कोअर 117/1

  16:26 (IST)

  मयंक अग्रवालचं अर्धशतक, केएल राहुलचीही संयमी खेळी, भारताची 100 रनकडे वाटचाल

  15:35 (IST)

  पहिल्या सत्रात भारतीय ओपनर्सची टिच्चून बॅटिंग. लंचपर्यंत भारताचा स्कोअर 83/0. मयंक अग्रवाल 46 रनवर आणि केएल राहुल 29 रनवर नाबाद. 36 रनवर असताना क्विंटन डिकॉकने सोडला मयंकचा कॅच. 

  14:33 (IST)

  पहिल्या तासामध्ये भारतीय ओपनर्सची सावध बॅटिंग. 14 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 42/0. मयंक अग्रवाल 26 रनवर तर केएल राहुल 16 रनवर नाबाद

  सेंच्युरियन, 26 डिसेंबर : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa 1st Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना आश्चर्यकारकरित्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे, तर न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या टेस्टमध्येच शतक आणि अर्धशतक करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) बाहेर बसावं लागलं आहे. इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे.

  रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे आधीच सीरिजमधून बाहेर झाला आहे, त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ओपनिंगला खेळतील. तर मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना मागच्या दोन वर्षांमध्ये शतक करता आलेलं नाही, त्यामुळे या दोघांचा शतकाचा दुष्काळ या सीरिजमध्ये तरी संपेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे अश्विन (R Ashwin) स्पिनर म्हणून खेळेल, तसंच बॅटिंग वाढवण्यासाठी शार्दुल ठाकूरलाही (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे. शार्दुल ठाकूरने पहिले ऑस्ट्रेलिया आणि मग इंग्लंडमध्ये तळाला बॅटिंग करून भारताला टेस्ट मॅच जिंकवून दिल्या आहेत.

  यावर्षाच्या सुरुवातीला भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजय मिळवला, तर इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. आता वर्षाचा शेवटही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट मॅच जिंकून करण्याचा

  विराटच्या टीमचा प्रयत्न असेल. भारताला अजून दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवता आलेला नाही.

  भारतीय टीम

  केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  दक्षिण आफ्रिकेची टीम

  डीन एल्गार, एडन मार्करम, कीगन पीटरसन, रसी वॅन डर डुसेन, टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, वियान मुल्डर, मार्को जॅनसन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी