मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA 1st Test : KLass शतक, पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारताचा!

IND vs SA 1st Test : KLass शतक, पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारताचा!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs South Africa 1st Test) भारतीय टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 272/3 एवढा झाला आहे. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर खेळत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
सेंच्युरियन, 26 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी (India vs South Africa 1st Test) भारतीय टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 272/3 एवढा झाला आहे. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर खेळत आहे. केएल राहुलच्या 248 बॉलच्या खेळीमध्ये 16 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यामध्ये 117 रनची पार्टनरशीप झाली. मयंक 60 रनवर आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. पुजाराची विकेट गेल्यानंतर टीम इंडिया अडचणीत होती, पण मग राहुलने पहिले विराटसोबत आणि मग अजिंक्य रहाणेसोबत पार्टनरशीप केली. विराट कोहली चांगल्या सुरुवातीनंतर 35 रनवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सगळ्या 3 विकेट घेतल्या. केएल राहुलसाठी ही खेळी खास आहे कारण रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याला टीमचा उपकर्णधार करण्यात आलं होतं. ही जबाबदारी मिळताच पहिल्याच सामन्यात राहुलने शतक केलं. त्याआधी राहुलने त्याचं शतक आणि अर्धशतक फोर मारूनच पूर्ण केलं. केएल राहुलचं या वर्षातलं हे दुसरं शतक आहे, याआधी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये त्याने 129 रनची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेत शतक करणारा राहुल 10 वा भारतीय खेळाडू आहे. याआधी 2018 साली विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत शतक केलं होतं. सेंच्युरियनमध्येच विराटने 153 रनची खेळी केली होती, पण भारताचा त्या टेस्टमध्ये पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक 5 शतकं सचिन तेंडुलकरने केली होती, यानंतर विराटच्या नावावर 2 शतकं आहेत. प्रविण आमरे यांनी आफ्रिकेत भारताकडून पहिलं शतक केलं होतं. केएल राहुलचं ओपनर म्हणून SENA देश म्हणजेच साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात चौथं शतक आहे. याबाबतीत फक्त सुनिल गावसकर 8 शतकांसह त्याच्या पुढे आहेत. वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री आणि विनू मंकड यांनी ओपनिंग करत या देशांमध्ये प्रत्येकी 3-3 शतकं केली होती.
First published:

Tags: Kl rahul, South africa, Team india

पुढील बातम्या