भारत VS दक्षिण आफ्रिका : पहिल्या वनडेत पावसाचा खेळ, अखेर सामना रद्द

भारत VS दक्षिण आफ्रिका : पहिल्या वनडेत पावसाचा खेळ, अखेर सामना रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द झाला.

  • Share this:

धर्मशाला, 12 मार्च : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. दुपारी दीडच्या सुमारास खेळ सुरु होणं अपेक्षित असताना पावसाला सुरुवात झाली. तेव्हा घातलेले कव्हर्स काढण्यात आले पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय मॅच रेफरींनी घेतला. सामना खेळवण्यासाठी किमान साडे सहाच्या आत खेळ सुरु व्हायला हवा होता. मात्र, पावसामुळे मैदानावर साचलेल्या पाण्यामुळं ते शक्य नसल्यानं सामना रद्द करण्यात आला.

भारतीय संघातील स्टार सलामीवीर रोहित शर्मा मात्र आफ्रिका दौऱ्यात खेळणार नाही. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. अजूनही रोहित पूर्ण बरा न झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारताला न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत दारूण पराभव सहन करावा लागला होता. हा पराभव विसरून आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.

मालिकेत पांड्या संघात आल्यानं विराटला आणखी चांगला पर्याय मिळाला आहे. विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये होते. केएल राहुलकडे पुन्हा एकदा यष्टीरक्षणाची जबाबादारी सोपवली जाऊ शकते. त्यामुळे ऋषभ पंतला संघाबाहेर रहावं लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा दुखापतीने बाहेर असल्यानं पुन्हा एकदा पृथ्वी शॉ किंवा शुभमन गिल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.

शमीला विश्रांती देण्यात आली आहे

भुवनेश्वर कुमार संघात आल्यानं गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुखापत झाल्यानं शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर धर्मशालाच्या वेगवान खेळपट्टीवर संघात रविंद्र जडेजा एकमेव फिरकीपटू असेल. याशिवाय कुलदीप यादवला संघात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ : शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2020 05:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading