• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : शेवटच्या मॅचमध्ये श्रीलंकेचा विजय, गुरुपौर्णिमेच्या दिवशी द्रविडच्या शिष्यांची निराशा

IND vs SL : शेवटच्या मॅचमध्ये श्रीलंकेचा विजय, गुरुपौर्णिमेच्या दिवशी द्रविडच्या शिष्यांची निराशा

टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडला (Rahul Dravid) गुरुपौर्णिमेच्या दिवशी विजयाची दक्षिणा देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. चांगल्या सुरुवातीनंतर झालेली घसरण आणि नंतर खराब फिल्डिंग यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

 • Share this:
  कोलंबो, 23 जुलै : टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडला (Rahul Dravid) गुरुपौर्णिमेच्या दिवशी विजयाची दक्षिणा देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. शेवटच्या टप्प्यात रंगलेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेनं टीम इंडियाचा 3 विकेट्सनं  पराभव केला.  चांगल्या सुरुवातीनंतर झालेली घसरण आणि नंतर खराब फिल्डिंग यामुळे भारतीय टीमनं हा सामना गमावला.  या विजयाबरोबर श्रीलंकेनं व्हाईटवॉशची नामुश्की टाळली. पण, टीम इंडियानं मालिका 2-1 नं जिंकली आहे. पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना 47 ओव्हर्सचा करण्यात आला होता. श्रीलंकेसमोर 47 ओव्हरमध्ये 227 रनचं टार्गेट होतं. कृष्णप्पा गौतमनं (K. Gowtham)  टीम इंडियाला  पहिलं यश झटपट मिळवून दिलं. त्यानंतर अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksha) यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 109 रनची पार्टनरशिप केली. या दोघांच्या खेळाला भारतीय फिल्डर्सनी खराब प्रदर्शन करत साथ दिली. अखेर चेतन सकारियानं (Chetan Sakariya) 65 रनवर आऊट करत ही जोडी फोडली. धनंजय डि सिल्वा (2) झटपट आऊट झाल्यानंतर टीम इंडियाला मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी होती. पण, खराब फिल्डिंगमुळे टीम इंडियाला ती संधी साधण्यात यश मिळालं नाही. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोनं सर्वात जास्त 76 रन काढले. टीम इंडियाकडून राहुल चहरनं सर्वात यशस्वी ठरला. त्याने 3 विकेट्स घेतल्या. चेतन सकारियाला 2 तर गौतम आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. या मालिकेतला श्रीलंकेचा हा पहिलाच विजय आहे. भारतानं पहिला सामना 7 विकेट्सनं तर दुसरा सामना 3 विकेट्स जिंकला होता. टीम इंडियाची घसरण तिसऱ्या वन-डेमध्ये चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यात टीम इंडियाला अपयश आले. पावसाच्या ब्रेकनंतर श्रीलंकेच्या स्पिनर्सनी जोरदार कमबॅक केले. त्यामुळे टीम इंडियाची पहिली इनिंग 43.1 ओव्हर्समध्ये 225 रनवर संपुष्टात आली. भारतीय बॅट्समनना संपूर्ण 47 ओव्हर्सही खेळण्यात अपयश आले. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यावेळी दुर्दैवी ठरला. त्याचे अर्धशतक फक्त 1 रननं हुकलं. संजू सॅमसनचंही (Sanju Samson) वन-डे पदार्पणात अर्धशतक झळकावण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. तो 46 रन काढून आऊट झाला. पावसाच्या अडथळ्यानंतर हा सामना 47 ओव्हर्सचा करण्यात आला. या ब्रेकचा श्रीलंकेच्या बॉलर्सना फायदा झाला. जयविक्रमानं लगेच मनिष पांडेला आऊट केले. पांडेनं 11 रन काढले. हार्दिक पांड्याला देखील मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. तो 19 रन काढून आऊट झाला. पांडे आऊट होताच सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गौतम आणि नितीश राणा हे झटपट आऊट झाले. टीम इंडियाची  4 आऊट 179 ते 8 आऊट 195 अशी घसरण फक्त 4.2 ओव्हर्समध्ये झाली. ऑलिम्पिकमध्ये डौलानं फडकला तिरंगा, भारतीय पथकाला पंतप्रधानांची मानवंदना वन-डे मालिकेतनंतर आता भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: