भारत वि. श्रीलंका : टाॅस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

भारत वि. श्रीलंका : टाॅस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारताला दुसरी कसोटी जिंकून लंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

  • Share this:

03 आॅगस्ट : भारत विरूद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असून श्रीलंकेला क्षेत्ररक्षणाचं आमंत्रण दिलं आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारताला दुसरी कसोटी जिंकून लंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

गॉल टेस्टमध्ये यजमान श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर आता आज कोलंबो टेस्टमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी टीम इंडिया अर्थात विराट कोहलची सेना सज्ज आहे.भारतानं सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिली टेस्ट जिंकली. तर लंका टीमला सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीमला रोखण्याचं मोठ आव्हान असेल.

कोलंबो टेस्टमध्ये कोहली अँड कंपनी श्रीलंकेला पराभूत करण्याच्या उद्देशानचं मैदानात उतणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी मैदानावर शंभर टक्के परफॉर्मन्स दाखवलाआणि लंकन टीमला पराभूत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 09:59 AM IST

ताज्या बातम्या