भारताच्या अंडर १९ टीमने पाकला लोळवलं, ६९ धावांत पाडला खुर्दा

भारताच्या अंडर १९ टीमने पाकला लोळवलं, ६९ धावांत पाडला खुर्दा

अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकचा दारुण पराभव करण्यात आला आहे. भारतानं 69 धावांमध्ये पाकिस्तानचा खुर्दा पाडलाय.

  • Share this:

30 जानेवारी : अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकचा दारुण पराभव करण्यात आला आहे. भारतानं 69 धावांमध्ये पाकिस्तानचा खुर्दा पाडलाय. भारत आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. आजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवण्यासाठी भारतानं 273 धावांचं आव्हान ठेवले होते. यात इशान पोरेलनं भेदक मारा केला आहे. पाकच्या चार खेळाडूंना हरवण्याचा किताब इशानने आपल्या नावे केला आहे. तर शिवासिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स केल्या आहेत. शुभमन गिलचं 94 बॉल्समध्ये शानदार शतक करुन पाकवर उत्तम खेळी केली आहे.

शुभमन गिलनं ९४ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी उभारली. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ८९ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला होता.

पृथ्वी शॉनं ४१, तर कालरानं ४७ धावांची खेळी केली होती. भरवंशाचा हार्विक देसाई वीस धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलनं एक खिंड लढवून भारतीय डावाला आकार दिला.

भारताच्या या उत्तम कामगिरीमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह पहायला मिळतोय. या विजयाचा सगळीकडे जल्लोष साजरा केला जातोय. अनेक दिग्गजांनी यावर ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 10:00 AM IST

ताज्या बातम्या