पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, आज होणार भारत-पाक सामना

पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, आज होणार भारत-पाक सामना

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते.

  • Share this:

दुबई, 1 नोव्हेंबर : भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. भारत-पाक यांच्यातील सामने मैदानापेक्षा, मैदानाबाहेर जास्त चर्चिले जातात. आता पुन्हा एकदा भारत-पाक आमने सामने येणार आहेत. आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एलिमिनेटर स्पर्धेसाठी सामना होणार आहे. त्यामुळं या दोघांमध्ये जो संघ बाजी मारेल तो थेट सेमीफायनलपर्यंत पोहचेल तर, पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल.

भारत-पाकिस्तान यांच्यात शुक्रवार (1 नोव्हेंबर) रोजी रेड बुल कॅपस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सामना होणार आहे. या वर्ल्ड फायनल्सच्या एलिमिनेटरमध्ये पाकला धुळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. या स्पर्धेतल तब्बल सात वेळा भारत-पाक आमने सामने आला आहे, यात भारतानं नेहमीच बाजी मारली आहे. त्यामुळं आठव्यांदाच पाकला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाची युगा ब्रिगेड सज्ज आहे.

भारतीय संघ याआधीच्या सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळं पाकला पराभूत करणे भारतासाठी सोपे आव्हान असेल. भारतानं याआधी बांगलादेश संघाला 103 धावांनी नमवले होते. त्यानंतर इंग्लंडला 33 धावांनी तर दक्षिण आफ्रिकेविरोधात 62 धावांनी पराभव सहन करावा लागला. भारतानं 4 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

वाचा-धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारताच रोहित शर्माने दिलं 'हे' उत्तर

दरम्यान, भारतीय संघाची फलंदाजी ही ट्रेलाश बाली आणि कर्णधार मयंक चौधरी यांवर अवलंबून आहे. पहिल्या सामन्यात मयंकनं तुफान फलंदाजी करत अर्धशतकी कामगिरी केली होती. तर, इंग्लंड विरोधात बालीनं 94 धावांची शानदार कामगिरी केली होती. त्यामुळं भारतीय संघाला पाकला धुळ चारण्यासाठी या दोन फलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

दुसरीकडे पाकिस्तान संघानं आतापर्यंत या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात युएईला त्यांनी 104 धावांनी पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेकडून त्यांना पराभव सहन करावा लागला. पाक संघाचा कर्णधार मोज्जम मलिक यानं भारताला पराभूत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा आत्मविश्वास व्यक्त केला. पाकचा संघही सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेल खेळणारा भारतीय संघ हा डीएव्ही चंदीगड कॉलेजच्या क्रिकेट संघातील आहे.

वाचा-सनी लिओनी दिसणार क्रिकेटच्या मैदानात, दिग्गजांबरोबर 'या' लीगमध्ये होणार सामिल

भारतीय संघाचा कर्णधार मयंक चौधरीनं, “आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आफ्रिका विरोधात शानदार प्रदर्शन करता आले नाही. मात्र, या सामन्यानं आम्हाला खुप काही शिकवले. त्यामुळं पाकिस्तान विरोधात आमच्यावर कोणताही दबाव नसणारआहे. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू”, असे सांगितले. दरम्यान, भारत-पाक यांच्यात 2012नंतर एकही मालिका झालेली नाही आहे. या दोन्ही संघ फक्त आयसीसी टुर्नामेंट एकमेकांविरोधात भिडतात. दरम्यान, भारत-पाक यांच्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सराव सामन्यात एकमेकांविरोधात भिडू शकतात.

वाचा-‘खूप सहन केलं, आता नाही’, वर्ल्ड कपमधल्या चहा प्रकरणावर भडकली अनुष्का

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Published by: Priyanka Gawde
First published: November 1, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या