मुंबई, 14 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातल्या क्रिकेट सामन्याची वाट दोन्ही देशांचे रसिक पाहत असतात. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) 24 ऑक्टोबरला या दोन्ही टीम आमने-सामने होत्या, तेव्हा बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला. वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला भारताविरुद्ध यश मिळालं. विराट कोहलीने (Virat Kohli) आता टीम इंडियाची (Team India) कॅप्टन्सी सोडली आहे. विराटच्याऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
Sports Pavilion ने दिलेल्या वृत्तानुसार 2022 च्या टी-20 आशिया कपचं (Asia Cup 2022) आयोजन श्रीलंकेमध्ये होणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातल्या सगळ्या टीम खेळतात, त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत आशिया कप 2022 चं आयोजन श्रीलंकेला द्यायचा निर्णय झाला. तर 2023 चा आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार आहे, त्यामुळे भारताला पाकिस्तानमध्ये जावं लागेल. ही स्पर्धा 50 ओव्हरची असेल.
टी-20 वर्ल्ड कपशिवाय पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होईल. तिकडेही भारत-पाकिस्तान मॅच होण्याची शक्यता आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने सुपर-12 च्या सगळ्या मॅच जिंकल्या, पण सेमी फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. दुसरीकडे टीम इंडियाला 5 पैकी फक्त 3 मॅच जिंकता आल्या. भारताचा पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. ज्यामुळे भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही.
टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं पारडं जड आहे. दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 9 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या, यातल्या 7 मॅचमध्ये भारताचा तर 2 मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला. दोन्ही टीमना बराच काळ टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला नाही. भारताने 2007 साली तर पाकिस्तानने 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup