IND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही !

पाकिस्तान संघाला आपले वर्ल्ड कपमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी चांगली खेळी करावी लागेल.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 03:03 PM IST

IND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही !

मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जंगी लढत होणार आहे. या सामन्या पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं भारताला पाकिस्तानसमोर मोठे आव्हान ठेवावे लागणार आहे. दरम्यान या सामन्यात दुखापतग्रस्त असलेल्या शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संधी देण्यात आली आहे. त्यामुळं सलामीला रोहित शर्मा आणि केएल राहुल उतरतील. तर चौथ्या क्रमांकावर विजय शंकरला संधी देण्यात आली आहे.

एकीकडे दोन्ही देशांच्या क्रीडाप्रेमींसाठी हा सामना म्हणजे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही आहे. त्यातच या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं सगळ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमद याचे मामा महबूब हसन यांनी वेगळेच भाकित केले आहे. महबूब हसन हे उत्तर प्रदेशच्या इटावा येथील रहिवासी आहेत, त्यांनी भारताविरुद्धच्या सामन्यात कोण सामना जिंकणार याबाबत खुलासा केला आहे.


Loading...


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महबूब यांनी भारत-पाक सामन्यात भारतानं सामना जिंकावा अशी इच्छ व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी पाकिस्तानचा कर्णधार आणि त्यांचा भाचा सरफराज अहमद यांनी चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. पण त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली कारण सर्फराज कर्णधारपदी कायम रहावा.

त्यांनी यावेळी, ‘भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगले खेळणारे आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा संघ शानदार आहे. त्यामुळं भारतीय संघ या सामन्यात विजयी व्हावा अशीच माझी इच्छा आहे. पण सरफराज अहमद यालाही माझ्या शुभेच्छा आहेत’’, असं सांगितले.

live Update :ओल्ड ट्रैफर्डमध्ये ढगाळ वातावरण, अर्ध्या तासात होणार टॉस

वाचा-चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार नाही पण...

वाचा- World Cup India vs Pakistan: या ठिकाणी पाहू शकता तुम्ही Live सामना

वाचा- World Cup : इथं 20 वर्षांनी भारत-पाक लढत, वाचा कशी असेल खेळपट्टी आणि हवामान

World Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 03:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...