टीम इंडियाला पुन्हा 'मौका', पाकसोबत फायनल 'पंगा' !

टीम इंडियाला पुन्हा 'मौका', पाकसोबत फायनल 'पंगा' !

पुन्हा एकदा टीम इंडियाला मौका मिळालाय. पाकिस्तानला पराभूत करण्याचा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच अजिंक्यपद कायम ठेवण्याचा.

  • Share this:

अमित मोडक, मुंबई

17 जून : पुन्हा एकदा टीम इंडियाला मौका मिळालाय. पाकिस्तानला पराभूत करण्याचा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच अजिंक्यपद कायम ठेवण्याचा.  रविवारी ओव्हलवर पुन्हा एकदा टीम इंडिया आणि पाकिस्तान समोरा-समोर असणार आहे. पण यावेळेस टेन्शन मात्र जास्त असणार आहे कारण मुकाबला फायनलचा असणार आहे.

टीम इंडियाचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत दमदार आहे. श्रीलंके विरुद्धचा पराभव सोडला तर टीम इंडियानं सगळ्या मॅचेसमध्ये वर्चस्व गाजवलंय.

रोहित शर्मा - शिखर धवन या ओपनिंग जोडीला फोडता फोडता पुढच्या टीमला नाकी नऊ येतंय. दोघांचाही फॉर्म बघता पाकिस्तानपुढे या जोडीला फोडण्याचं मोठं आव्हान असेलं.

पाक विरुद्ध या जोडीनं १३६ रन्सची पार्टनरशिप केली होती. त्यानंतर कॅप्टन विरोटही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ४ मॅचमध्ये विराटच्या खात्यात २५३ रन्स आहेत. ही तीकडी चालली तरी

पाकिस्तान मानवर काढू शकणार नाही.

इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या यशामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. पण बॅटिंग पाकिस्तानसाठी खरी डोकेदुखी आहे. बाबर आझम, सरफराज अहमद, अझर अली प्रभावी कामगिरी करू शकलेले नाहीत. बाॅलिंग कागदावर प्रभावी वाटत असलीतरी मैदानात अजूनपर्यंत हवीतशी छाप त्यांना पाडता आलेली नाही.

भारत-पाकिस्तानची टक्कर आणि तीही फायनलमध्ये असा योग बऱ्याच वर्षानंतर आलाय. त्यामुळे एक धमाकेदार फायनल बघायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

First published: June 17, 2017, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading