• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ‘ही रात्र खास होती' म्हणत पाकिस्तानच्या खेळाडूने MS Dhoni सोबतचा 'तो' फोटो केला शेअर

‘ही रात्र खास होती' म्हणत पाकिस्तानच्या खेळाडूने MS Dhoni सोबतचा 'तो' फोटो केला शेअर

Fanboy Shahnawaz Dahani with MS Dhoni

Fanboy Shahnawaz Dahani with MS Dhoni

महेंद्र सिंह धोनीचे (mentor ms dhoni) भारतासह जगभरात चाहते पाहायला मिळतात. कट्टर प्रसिस्पर्धी मानल्या जाणऱ्या पाकिस्तान (Pakistan) संघातही धोनीचे चाहते पाहायला मिळत आहेत.

 • Share this:
  दुबई, 26 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाच्या मेटॉरची भूमिका सांभळणारा महेंद्र सिंह धोनीचे (mentor ms dhoni) भारतासह जगभरात चाहते पाहायला मिळतात. कट्टर प्रसिस्पर्धी मानल्या जाणऱ्या पाकिस्तान (Pakistan) संघातही धोनीचे चाहते पाहायला मिळत आहेत. रविवारी पाकिस्तानसोबत झालेल्या सामन्यानंतर, पाकिस्तान संघातील युवा वेगवान गोलंदाज शहानवाज धनी (Shahnawaz Dahani) याने भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी याच्यासोबतचे एक फोटो शेअर करत ‘ही रात्र खास होती' अशी कॅप्शन देत धोनीला भेटलेल्याचा आनंद व्यक्त केला आहे. पाकिस्तानने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते आनंदात होते. या विजयानंतर पाकिस्तानचे काही खेळाडू भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनी याच्याशी चर्चा करताना दिसले. यामध्ये कर्णधार बाबर आझम, अनुभवी शोएब मलिक व इमाद वसिम यांचा समावेश होता. त्यानंतर पाकिस्तान संघासह या विश्वचषकासाठी नेट बॉलर म्हणून असलेला शहानवाज धनी हा धोनीसह चर्चा करताना दिसला. धनी याने धोनीसह एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने खास कॅप्शन दिली आहे. 'ही रात्र खास होती. पाकिस्तानच्या विजयाचा आनंद आणि माझ्या स्वप्नातील एका खेळाडूला भेटल्याचा उत्साह @msdhoni विसरता येत नाही.' असे शहानवाज धनी याने म्हटले आहे. टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. भारताने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज दीडशतकी भागीदारीच्या जोरावर 10 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय संघावर मात केली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: