पाकिस्तानची भारताला धमकी,'आमच्या इथं आशिया कप खेळायला या नाहीतर...'

पाकिस्तानची भारताला धमकी,'आमच्या इथं आशिया कप खेळायला या नाहीतर...'

सप्टेंबर 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये आशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आधीच आपण या स्पर्धेत उतरण्यासाठी पाकिस्तानमध्ये खेळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

लाहोर, 25 जानेवारी : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला धमकी दिली आहे. भारत जर यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर त्यांचा संघ 2021 मध्ये भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भाग घेणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. सप्टेंबर 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये आशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आधीच आपण या स्पर्धेत उतरण्यासाठी पाकिस्तानमध्ये खेळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी धमकी देताना म्हटलं की, भारत जर आशिया कपमध्ये खेळण्यास येणार नसेल तर पाकिस्तान टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतात खेळायला नकार देईल.

बीसीसीआय आणि पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे आशिया कपच्या ठिकाणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष वसीम खान यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी20 आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्यांच्या संघ पाठवण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर पाकिस्तानने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपचे यजमानपद बांगलादेशलासुद्धा दिल्याचं म्हटलं जात आहे.

वसीम यांनी पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, आय़ोजनाच्या ठिकाणात बदल करण्याचा अधिकार पीसीबी किंवा आयसीसीला नाही. कारण यावर कोणताही निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेला घेता येतात. आशियाई क्रिडा स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देणं शक्य नसल्याचंही सांगितलं जात आहे. कारण भारत सुरक्षेच्या कारणामुळे इथं खेळण्यास तयार होणार नाही.

कसोटीमध्ये इंग्लंडचा दबदबा, अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. अशा परिस्थितीत पाकिस्तानला स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची भीती व्यक्त केली जात होती. भारताने गेल्या 12 वर्षांपासून पाकिस्तान दौऱा केलेला नाही. शेवटचा दौरा 2008 मध्ये केला होता. पाकिस्तानने भारत दौरा 2012 मध्ये केला होता. त्यावेळी एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळवण्यात आल्या होत्या.

केएल राहुलच्या खेळामुळे पंतचे भविष्य धोक्यात? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 08:47 PM IST

ताज्या बातम्या