मुंबई, 02 फेब्रुवारी : भारताच्या टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्याची मालिका 2-1 ने जिंकली. या मालिकेत पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. थ्वी शॉने जुलै 2021 मध्ये अखेरचा टी20 सामना खेळला होता. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध मालिकेआधी हार्दिक पांड्याने म्हटलं होतं की, पृथ्वी शॉला वाट पाहावी लागेल कारण गिल चांगली कामगिरी करत आहे.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीसह जल्लोष केला. यावेळी हार्दिक पांड्याने ट्रॉफी पृथ्वी शॉच्या हातात दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांड्याच्या या कृतीवर काहींनी टीका केलीय तर काहींनी कौतुकसुद्धा केलं आहे. आधी संघाबाहेर बसवून त्याला सेलिब्रेशन करताना ट्रॉफी देऊन काय दाखवायचंय? असा प्रश्न काही चाहत्यांनी विचारलं आहे. तर काहींनी पांड्याने रुसवा काढण्यासाठी शॉकडे ट्रॉफी दिली असं म्हटलं.
हेही वाचा : असं कोण खेळतं? मोईन अलीचा विचित्र फटका, VIDEO VIRAL
पृथ्वी शॉने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीच्या राउंड 5 मध्ये गेल्या महिन्यात त्रिशतक झळकावलं होतं. त्याने 326 चेंडूत 49 चौकार आणि 4 षटकार मारत 379 धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीत कोणत्याही सलामीवीर फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने त्रिपुराच्या समित गोहेलचा विक्रम मोडला. गोहेलने 2016 मध्ये नाबाद 359 धावांची खेळी केली होती.
भारताने न्यूझीलंडला तिसऱ्या सामन्यात 168 धावांनी पराभूत केलं. यासह मालिका 2-1 ने जिंकली. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारताने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडला 12.1 षटकात ६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket