मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शुभमन गिलची गाडी सुसाट! शतक झळकावताच झाले अनेक विक्रम

शुभमन गिलची गाडी सुसाट! शतक झळकावताच झाले अनेक विक्रम

shubman gill

shubman gill

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात भारताने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर धावसंख्येचा डोंगर उभा केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदाबाद, 01 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात भारताने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर धावसंख्येचा डोंगर उभा केला. भारताने 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या. शुभमन गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेताना तुफान फटकेबाजी करत शतक झळकावलं. त्यानेने २०० च्या स्ट्राइक रेटने 63 चेंडूत 126 धावा केल्या. शुभमन गिलने या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकार मारले.

शुभमन गिलची ही खेळी त्याच्या टी20 कारकिर्दीतली सर्वोच्च खेळी ठरली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 208 इतकी आहे. दरम्यान, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो पाचवा ठरला आहे. याआधी अशी कामगिरी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली यांनी केली होती. आता शुभमन गिलही त्यांच्या पंकत्ती बसला आहे.

हेही वाचा : IND vs NZ 3rd T20 : शुभमन गिलचं झंझावाती शतक, भारताने उभारली मोठी धावसंख्या

भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलने या खेळीसह केला. याआधीचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने दुबईत गेल्या वर्षी अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने इंदौरमध्ये 2017मध्ये 118 धावांची खेळी केली होती.

First published:

Tags: Cricket