Home /News /sport /

World Test Championship : पाहा कधी आणि कुठे होणार फायनल

World Test Championship : पाहा कधी आणि कुठे होणार फायनल

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये विजय मिळवत भारतीय टीमने (India vs England) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होणार आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 6 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये विजय मिळवत भारतीय टीमने (India vs England) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) धडक मारली आहे. चौथ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि 25 रनने विजय झाला. पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचं आव्हान खडतर झालं. पण शेवटच्या तीन टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने ही सीरिज 3-1 ने खिशात टाकली. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जूनपर्यंत लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी (India vs New Zealand) होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताने 12 तर न्यूझीलंडने 7 मॅच जिंकल्या आहेत. न्यूझीलंडने त्यांच्या घरच्या मैदानात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 2-0ने पराभव केला होता. तसंच 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही न्यूझीलंडने भारताला हरवलं होतं. 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही न्यूझीलंडने भारताला मात दिली होती. भारत या सगळ्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय टीम 10व्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी भारताने तीन वेळा वनडे वर्ल्ड कप, दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप आणि चार वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आता भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट सीरिजची फायनलही खेळेल. भारतीय टीमने दोन वेळा वर्ल्ड कप, दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाची टीमही सर्वाधिक 10 वेळा आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. चौथ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडचा 205 रनवर ऑल आऊट झाला, यानंतर भारताने 365 रन केले. ऋषभ पंतने 101 रनची तर वॉशिंग्टन सुंदरने 96 रन केले. अक्षर पटेलनेही 43 रनची महत्त्वाची खेळी केली. यानंतर इंग्लंडचा 135 रनवर ऑल आऊट झाला. लॉरेन्सने सर्वाधिक 50 रन केले, तर कर्णधार जो रूटने 30 रनची खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या