Home /News /sport /

न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं का घेतला? Rahul Dravidचा खुलासा

न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं का घेतला? Rahul Dravidचा खुलासा

Rahul Dravid

Rahul Dravid

मुंबईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand) भारतीय टीमनं 372 रननं दणदणीत विजय मिळवला.

    मुंबई, 6 डिसेंबर: मुंबईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs New Zealand) भारतीय टीमनं 372 रननं दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडने(Rahul Dravid) माध्यामांशी संवाद साधला. यावेळी द्रविडने संघातील युवा खेळाडूंचे कौतुक करत एका गोष्टीचा खुलासा केला तो म्हणजे फॉलो ऑनचा. न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं का घेतला? (Why Virat Kohli didn't enforce follow-on during Mumbai Test?)याबद्दला द्रविडने भाष्य केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मुंबई दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 263 रनची आघाडी घेतली. त्यानंतरही न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला. त्यावेळी अनेकांना याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. भारताच्या विजयानंतर द्रविडने याबाबत खुलासा केला आहे. ''आम्हाला माहित आहे की आमच्याकडे खूप वेळ आहे, आम्ही फॉलोऑनबद्दल जास्त विचार केला नाही. संघात अनेक युवा फलंदाजही होते, त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना फलंदाजीची संधी द्यायची होती. आम्हाला माहित होते की आम्ही भविष्यात अशा परिस्थितीत असू शकतो जिथे आम्हाला कठीण परिस्थितीत असे करण्यास भाग पाडले जाऊ शकते म्हणून ही एक उत्तम संधी होती. आमच्या खेळाडूंना विकसित करण्यात मदत करणे खूप चांगले होते.'' असे द्रविडने यावेळी सांगितले. द्रविडची ही भूमिका पाहून क्रिकेट जगतात त्याचे कौतुक होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ) 372 धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी सर्वात मोठा विजय 337 धावांचा होता, जो 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळाला होता. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली आहे. यापूर्वी कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. मालिका विजयानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघ आणि युवा खेळाडूंचे जोरदार कौतुक केले. विजयाचे श्रेय त्या खेळाडूंना जाते ज्यांनी पुढे जाऊन चमकदार कामगिरी केली. जयंत यादवने आज जबरदस्त खेळ दाखवला. मात्र, कालचा दिवस त्याच्यासाठी कठीण होता. पण त्यातून शिकून त्याने आज चांगली कामगिरी केली. मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, ज्या खेळाडूंना फारशी संधी मिळत नाही, त्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. अक्षरने दाखवून दिले की तो बॅटने काय करू शकतो. यासह संपूर्ण मालिकेत त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ते पाहणे खूप छान वाटले. हे आम्हाला बरेच पर्याय देखील देते, आम्हाला एक मजबूत बाजू बनण्यास मदत करते." अशा शब्दात द्रविडने युवा खेळाडूंचे कौतुक केले. तसेच, ही चांगली परिस्थिती आहे, आमचे वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत आपण आपल्या खेळाडूंचे शारीरिक आणि मानसिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हे माझ्या आव्हानाचा एक मोठा भाग असणार आहे, निवडकर्त्यांसाठी आणि नेतृत्व गटासाठीही आव्हान आहे. ही एक चांगली निवड डोकेदुखी आहे. तरुण मुले चांगली कामगिरी करतात ते पहा. त्यांना चांगले करण्याची खूप इच्छा आहे आणि ते सर्व एकमेकांना मागे टाकत आहेत. मला आशा आहे की जोपर्यंत आमच्यात स्पष्ट संभाषण असेल आणि आम्ही खेळाडूंना समजावून सांगू शकत असल्याचे समस्यांची जाणीव होत नाही. यासोबतच द्रविडने काही वरिष्ठ खेळाडूंची उणीव भासली असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Rahul dravid, Team india

    पुढील बातम्या