मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

राहुल द्रविडच्या महान शिष्याची Team India मध्ये एन्ट्री; साउथ आफ्रिकेविरुद्ध मिळणार संघात स्थान

राहुल द्रविडच्या महान शिष्याची Team India मध्ये एन्ट्री; साउथ आफ्रिकेविरुद्ध मिळणार संघात स्थान

Washington Sundar

Washington Sundar

बीसीसीआयच्या(BCCI) सुत्रांनुसार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुंदरला (washington sundar) टीम इंडियात स्थान मिळू शकते.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हा न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नसला तरीही तो संघाचा(Team India) एक हिस्सा बनला आहे. कारण तो प्रॅक्टिसदरम्यान संघातील खेळाडूंसोबत दिसला आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी केली नाही, परंतु 15 नोव्हेंबर रोजी सुंदरने भारतीय फलंदाजांना थ्रोडाउनसह सराव करायला लावला.

बीसीसीआयच्या(BCCI) सुत्रांनुसार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुंदरला टीम इंडियात स्थान मिळू शकते. अशी चर्चा क्रिकेट जगतात सुरु झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 'दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदर तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा निवडकर्त्यांना आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सुंदर हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. तो गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजही आहे, त्यामुळे खालच्या फळीत त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. टी-20 विश्वचषकादरम्यान सुंदरची अनुपस्थिती संघाला खूप जाणवली.

कसोटीत वॉशिंग्टनचा सुंदर खेळ

सुंदरने T20 आणि ODI मध्ये आपल्या खेळाने खूप प्रभावित केले आहे. त्यानंतर जेव्हा त्याला टेस्टमध्ये खेळण्यीची संधी मिळाली तेव्हा तिथेही त्याची क्षमता दिसून आली. त्याने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून 66.25 च्या सरासरीने 265 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके झळकली आहेत. त्याचबरोबर त्याने सहा विकेट्सही घेतल्या आहेत. यादरम्यान ब्रिस्बेन कसोटीत त्याने अर्धशतक ठोकले आणि शार्दुल ठाकूरच्या साथीने भारताला संकटातून बाहेर काढले. त्याचवेळी अहमदाबाद कसोटीत तो थोड्या फरकाने शतकापासून दूर होता.

सुंदरने आपल्या कसोटी कारकिर्दीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सुरुवात केली. त्यानंतर घरच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध चांगला खेळ दाखवला. यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. आता दुखापत झाल्याने जयंत यादवला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुसरा ऑफस्पिनर म्हणून घेण्यात आले. जयंतने चार वर्षांनंतर टीम इंडियात स्थान मिळवले आहे. सुंदर जखमी झाला नसता तर जयंतला जागा मिळू शकली नसती.

First published:

Tags: Rahul dravid, South africa, Team india