Home /News /sport /

IND vs NZ: अंपायरच्या चुकीमुळे Virat Kohli च्या नावावर लाजिरवाणे रेकॉर्ड

IND vs NZ: अंपायरच्या चुकीमुळे Virat Kohli च्या नावावर लाजिरवाणे रेकॉर्ड

Virat Kohli

Virat Kohli

विराट कोहली (Virat Kohli) घरच्या मैदानावर सर्वाधिक शून्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

    मुंबई, 3 डिसेंबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. टीम इंडियामध्ये विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण विराट कोहली (Virat Kohli) खाते खोलू शकला नाही. त्यामुळे विराटच्या नावावर लाजिरवाणे रेकॉर्ड झाले आहे. विराट कोहली घरच्या मैदानावर सर्वाधिक शून्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. कोहली खाते न उघडता परतण्याची कर्णधार म्हणून भारताची ही सहावी वेळ आहे. त्यांच्या आधी हे रेकॉर्ड एमके पतौडीच्या नावावर होता, ते घरच्या मैदानात पाच वेळा शून्यावर बाद झाले होते. टेस्टमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्यां कर्णधारांच्या यादीत कोहली आता संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीसोबत दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. या दोघांनंतर इंग्लंडचा मायकेल अथर्टन, दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए आणि भारताचा महेंद्रसिंग धोनी याचा क्रमांक लागतो. या तिघांच्याही नावावर कर्णधार म्हणून कसोटीत आठ वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे. विशेष म्हणजे, कोहली न्यूझीलंडविरुद्ध शून्यावर बाद एकदा नव्हे तर तब्बल 14 वेळ झाला आहे. कोहली किवी संघाविरुद्धच्या कसोटीत एकूण 14 वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) या ओपनरनी टीम इंडियाला 80 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण यानंतर भारताच्या लागोपाठ तीन विकेट गेल्या आणि टीमचा स्कोअर 80/3 असा झाला. शुभमन गिल 44 रनवर आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) शून्य रनवर आऊट झाले. IND vs NZ : खेळाडूंना बाहेर करण्यासाठी विराट असा करतो 'खेळ', एकाच कारणामुळे 5 खेळाडू OUT!
     चेतेश्वर पुजाराला एजाझ पटेलने (Ajaz Patel) बोल्ड केलं, तर यानंतर लगेच त्यानेच विराट कोहलीला एलबीडब्ल्यू केलं. एजाझ पटेलने एकाच ओव्हरमध्ये टीम इंडियाचे दिग्गज असलेल्या पुजारा आणि विराटला माघारी पाठवलं, असं असलं तरी आता विराटच्या विकेटवरून वाद सुरू झाला आहे.
    कोहलीला मैदानातले अंपायर नितीन मेनन यांनी आऊट दिलं, यानंतर विराटने एकही क्षण न घालवता डीआरएस घेतला. बॉल बॅटला लागल्याचा विश्वास विराटला होता. थर्ड अंपायरनेही अनेकवेळा रिप्ले बघितले, पण तरीही थर्ड अंपायरला योग्य निर्णयापर्यंत पोहोचता आलं नाही, अखेर त्याने मैदानातल्या अंपायरने दिलेल्या निर्णयासोबत जायचं ठरवलं, ज्यामुळे विराटला माघारी परतावं लागलं.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: MS Dhoni, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या