मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : भारताच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, करियरला लागणार कायमचा ब्रेक!

IND vs NZ : भारताच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, करियरला लागणार कायमचा ब्रेक!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाने बरेच प्रयोग केले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाने बरेच प्रयोग केले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाने बरेच प्रयोग केले आहेत.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 23 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला (India vs New Zealand Test Series) 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरुवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाने बरेच प्रयोग केले आहेत. टी-20 टीमचा कर्णधार असणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) पहिली टेस्ट खेळणार नाही. विराटऐवजी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीमचं नेतृत्व करणार आहे. तर दुसरीकडे पहिल्या टेस्टच्या दोन दिवस आधीच केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजमधून बाहेर झाला आहे. राहुलऐवजी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड झाली आहे. रोहित, विराट आणि राहुल हे तीन महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नसणं अजिंक्य रहाणे आणि कोच राहुल द्रविड यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. तसंच ही सीरिज टीम इंडियाच्या तीन खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या सीरिजमध्ये जर या खेळाडूंना सूर गवसला नाही, तर तिघांच्या करियरला ब्रेक लागू शकतो. हे तीन खेळाडू आहेत अजिंक्य रहाणे, ऋद्धीमान साहा आणि ईशांत शर्मा.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेच्या कामगिरीत मागच्या दोन वर्षांमधल्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेलबर्न टेस्टमध्ये केलेल्या शतकानंतर रहाणेला एकही शतक करता आलं नाही. इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही रहाणेला संघर्ष करावा लागला. लॉर्ड्स टेस्टमध्ये केलेल्या अर्धशतका व्यतिरिक्त त्याला इतर एकाही इनिंगमध्ये 20 रनचा टप्पा ओलांडता आला नाही. यानंतरही रहाणेची टीममध्ये निवड झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने तर अजिंक्य रहाणेचं नशीब चांगलं असल्यामुळे तो अजूनही टीममध्ये असल्याचं वक्तव्य केलं. दोन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अय्यर आणि सूर्यकुमार यांनी चांगली कामगिरी केली, तरी रहाणेचं स्थान अडचणीत येऊ शकतं.

ऋद्धीमान साहा

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी ऋषभ पंतला आराम देण्यात आला आहे, त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) विकेट कीपर म्हणून मैदानात उतरेल, असं बोललं जातंय. या सीरिजसाठी दुसरा विकेट कीपर म्हणून युवा खेळाडू केएस भरत (KS Bharat) याचीही निवड करण्यात आली आहे. 2010 साली भारतीय टीममध्ये पदार्पण केलेल्या साहाचं वय 37 वर्षांचं आहे, त्यामुळे या वयात साहाने केलेली एकही चूक फक्त त्याला टीममधूनच बाहेर नेणार नाही, तर त्याचं करियरही संपवेल. या सीरिजनंतर ऋषभ पंतचं टीममध्ये पुनरागमन होईल, हे निश्चित आहे, तसंच केएस भरत हादेखील तरुण आहे, त्यामुळे निवड समिती भविष्यात साहाऐवजी या दोघांचाच विचार करू शकते.

भारताचा फास्ट बॉलर ईशांत शर्माला (Ishant Sharma) गेल्या काही काळापासून दुखापतींनी सतावलं आहे. इंग्लंड दौऱ्यात इशांत शर्माच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसलं नाही. भारतीय टीममधल्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या फास्ट बॉलरनी गेल्या काही काळात धमाकेदार कामगिरी केली आहे. या तीन फास्ट बॉलर्समुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात दोनदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही टीमने आघाडी घेतली. या तिघांच्या कामगिरीमुळे उमेश यादवलाही बेंचवर बसावं लागत आहे, पण त्याने जेवढ्या संधी मिळाल्या, त्यात उल्लेखनीय कामगिरी केली. न्यूझीलंड सीरिजमधून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे ईशांत शर्माकडे फास्ट बॉलिंगचं नेतृत्व घेऊन स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातही टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध जर चांगली कामगिरी केली नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून रहाणे, साहा आणि ईशांत शर्मा यांना डच्चू मिळू शकतो.

भारतीय टीम

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा , उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

First published: