News18 Lokmat

भारताच्या या कामगिरीवर विराटची रिअॅक्शन; चाहत्यांनी केले ट्रोल!

टीम इंडियाच्या आजच्या कामगिरीवर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत आणि त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला.

News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2019 12:34 PM IST

भारताच्या या कामगिरीवर विराटची रिअॅक्शन; चाहत्यांनी केले ट्रोल!

नवी दिल्ली, 31 जानेवारी: न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेत भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले. भारताचा डाव केवळ 92 धावात संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयापाठोपाठ न्यूझीलंडमध्ये देखील भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. पण चौथ्या वनडेत भारताने निराश केले. या कामगिरीची दखल सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी घेतली.

सकाळ सकाळी सामना पाहण्यासाठी ज्यांनी टीव्ही सुरु केला त्यांना भारतीय संघाची अवस्था पाहून धक्काच बसला. 2019मधील भारतीय संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघात ना विराट कोहली होता ना धोनी. हे दोन्ही खेळाडू नसताना भारतीय संघाने अशी खराब कामगिरी केली. वनडेमधील भारतीय संघाचा हा 7व्या क्रमांकाचा निच्चांकी स्कोर आहे. भारताने 2000साली श्रीलंकेविरुद्ध सर्वात कमी 54 धावा केल्या होत्या. टीम इंडियाच्या आजच्या कामगिरीवर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत आणि त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला. यातील काही पोस्ट तितक्याच मजेशीर देखील आहेत.
Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...