Home /News /sport /

वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरणार टीम इंडिया? विराटनं सांगितला प्लॅन

वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उतरणार टीम इंडिया? विराटनं सांगितला प्लॅन

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 24 जानेवारीपासून होत आहे.

    ऑकलंड, 23 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 24 जानेवारीपासून होत आहे. नववर्षात भारताचा हा पहिला परेदश दौरा असणार आहे. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा भारताकडे असणार आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं भारतीय संघाचा वेगळाच प्लॅन असल्याचे सांगितले आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानं भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यामुळं 24 जानेवारीपासून होणाऱ्या सामन्याआधी विराटलं याबाबत विचारले असता त्याने, “कोणताही बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार नाही. खर सांगायचे तर आमचे आणि न्यूझीलंड संघाचे संबंध चांगले आहेत. आम्ही फक्त मैदानावर प्रतिस्पर्धी आहोत”, असे सांगितले. ‘वर्ल्ड कपमध्ये जे झाले त्याबाबत खेद नाही’ न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला तेव्हा आपण आनंदी असल्याचेही विराटने सांगितले. विराटनं सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत, ही मालिका चांगले क्रिकेट खेळणार्‍या दोन संघांमधील आहे, असे सांगितले. तसेच, 'न्यूझीलंड एक चांगली टीम आहे आणि या संघाबद्दल आम्हाला खूप आदर आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा आम्हाला आनंद झाला कारण जेव्हा आपण हरतो तेव्हा आपल्याला मोठा विचार करावा लागेल. एक संघ म्हणून त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट होती. मला वाटत नाही की या मालिकेत बदल होईल’, असे उत्तर देत सर्वांचे मन जिंकले. भारतीय संघात कोणतेही बदल होणार नाहीत दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारतीय संघात विशेष चांगले बदल केले जाणार नाहीत, असे संकेतही विराटने यावेळी दिले. तसेच, या मालिकेपूर्वी विराटने पुन्हा एकदा केएल राहुलची जोरदार प्रशंसा केली आणि टीम मॅन म्हणून वर्णन केले. कोहली म्हणाला, 'राहुल देखील विकेटच्या मागे चांगले काम करत आहे आणि सामन्यात कोणत्याही परिस्थितीसाठी तो सज्ज आहे. त्याच्या संघात असल्याने आम्हाला अतिरिक्त फलंदाजासह उतरण्याची संधी मिळते. तो कोणत्याही प्रकारची भूमिका करण्यास तयार आहे. तो पूर्ण टीम मॅन आहे”, त्यामुळं श्रीलंकेविरुद्ध जो भारतीय संघ होता तोच आता पुन्हा न्यूझीलंडविरुद्ध दिसू शकतो. असा आहे भारताचा टी-20 संघ- विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर. टी-20 मालिका- 24 जानेवारी- पहिला टी20 सामना 26 जानेवारी- दुसरा टी20 सामना 29 जानेवारी-तिसरा टी20 सामना 31 जानेवारी-चौथा टी20 सामना 2 फेब्रुवारी-पाचवा टी20 सामना एकदिवसीय मालिका 05 फेब्रुवारी- पहिला एकदिवसीय सामना 08 फेब्रुवारी-दुसरा एकदिवसीय सामना 11 फेब्रुवारी-तिसरा एकदिवसीय सामना कसोटी मालिका 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी-पहिला कसोटी सामना 29 फेब्रुवारी ते 04 मार्च- दुसरा कसोटी सामना
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या