मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटप्रेमींना खुशखबर! IND vs NZ सामन्यात फॅन्सना मिळणार एन्ट्री, पण...

क्रिकेटप्रेमींना खुशखबर! IND vs NZ सामन्यात फॅन्सना मिळणार एन्ट्री, पण...

New Zeland Tour India 2021

New Zeland Tour India 2021

टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेनंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानात न्यूझीलंडशी भिडणार आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेनंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानात न्यूझीलंडशी भिडणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर (New Zeland Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, क्रिकेटप्रेंमीसाठी क्रिकेट जगतातून खूशखबर आली आहे. न्यूझीलंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या सामन्यात फॅन्सना एन्ट्री मिळणार आहे. मात्र, चाहत्यांना दोन अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

17 नोव्हेंबरपासून हे सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा पहिला सामना जयपुर येथील सवाई मानसिंह स्टेडियम खेळवण्यात येणार आहे. या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली असतानाच हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे. यासंबधी अधिक माहिती राजस्थान क्रिकेट संघ (RCA) चे सचिव महेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

कोविड-19 साठी किमान एकदा लसीकरण झालेल्यांना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पहिल्या भारत-न्यूझीलंड T20 सामन्यासाठी बसण्याची परवानगी दिली जाईल.

याशिवाय, त्यांना निगेटिव्ह RT-PCR कोविड-19 चाचणी अहवाल दाखवावा लागेल. तो अहवाल 48 तासापूर्वीचा नसावा. म्हणाले, “कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून, सामन्यात प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत राज्य सरकारच्या गृह विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने या संदर्भात मॅचमध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशासाठी विभागाकडून परवानगी घेतली आहे. खबरदारी म्हणून, प्रेक्षकांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगसह सर्व सरकारी प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

तसेच ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रेक्षकांव्यतिरिक्त कर्मचारी आणि खेळाडूंनी मास्कचा अनिवार्य वापर, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग, योग्य वेंटिलेशन आणि कोविड लसीच्या किमान एक डोससह लसीकरण यासारख्या योग्य पद्धतींचे पालन केले पाहिजे. सामन्याच्या आयोजनासाठी गठित समितीची बैठक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता आरसीए अकादमी येथे आयोजित करण्यात आली असून, सामना आयोजित करण्यापूर्वीच्या तयारीशी संबंधित विविध समस्या आणि कामांवर चर्चा करण्यात येणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर.

दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची.

तिसरा सामना, रविवार, कोलकाता.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.

First published:

Tags: BCCI, New zealand, Team india