IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवन ऐवजी 'या' खेळाडूला मिळाली संधी

IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवन ऐवजी 'या' खेळाडूला मिळाली संधी

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापत झालेल्या शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापत झालेल्या शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी पृथ्वी शॉला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तसंच एकदिवसीय सामन्यासाठी केदार जाधवलाही संधी देण्यात आली आहे. तर टी-20 सामन्यासाठी संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे.

असा असेल भारतीय एकदिवसीय संघ :  विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा, केदार जाधव आणि शार्दुल ठाकूर

असा आहे भारताचा टी-20 संघ-  : विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर

भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला 24 जानेवारीपासून सुरुवात होईल. यात भारतीय संघ टी-20, वनडे आणि कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. याआधी भारतीय संघ 14 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यात धोनी आणि हार्दिक पांड्या यांना संधी देण्यात आलेली नाही. तर, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहनं या मालिकेतून कमबॅक केला आहे.

असा आहे भारताचा न्यूझीलंड दौरा

24 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होईल. यात 5 टी-20, तीन एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. भारत-न्यूझीलंड दौरा हा 24 जानेवारी ते 4 मार्च असा खेळला जाणार आहे. 2020मधील भारताचा हा पहिला विदेशी दौरा असेल.

टी-20 मालिका

24 जानेवारी- पहिला टी20 सामना

26 जानेवारी- दुसरा टी20 सामना

29 जानेवारी-तिसरा टी20 सामना

31 जानेवारी-चौथा टी20 सामना

2 फेब्रुवारी-पाचवा टी20 सामना

एकदिवसीय मालिका

05 फेब्रुवारी- पहिला एकदिवसीय सामना

08 फेब्रुवारी-दुसरा एकदिवसीय सामना

11 फेब्रुवारी-तिसरा एकदिवसीय सामना

कसोटी मालिका

21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी-पहिला कसोटी सामना

29 फेब्रुवारी ते 04 मार्च- दुसरा कसोटी सामना

First published: January 21, 2020, 9:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या