News18 Lokmat

IND vs NZ : पावसामुळं सामना थांबला, भारताला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान

दरम्यान पावसामुळं 47व्या ओव्हरमध्ये पंचांनी सामना थांबवला. 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 211 धावा केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 07:09 PM IST

IND vs NZ : पावसामुळं सामना थांबला, भारताला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान

मॅंचेस्टर, 09 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सुरु असलेल्या भारत-न्यूझीलंड यांचा सामना पावसामुळं थांबला आहे. दरम्यान न्यूझीलंडनं 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 211 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावर भारतीय गोलंदाजांनी पाणी फेरले. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहनं गुप्टिलला माघारी धाडले. न्यूझीलंडन या सामन्यात खुपच धिमी फलंदाजी केली. 40 ओव्हरनंतर त्यांनी पहिल्यांदा रनरेटमध्ये 4चा आकडा गाठला. दरम्यान पावसामुळं 47व्या ओव्हरमध्ये पंचांनी सामना थांबवला.

दरम्यान पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं जर न्यूझीलंड पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर, भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं भारताला 6च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत. जर, सामना 40 षटकांचा होणार आहे.

पहिल्या दोन ओव्हर निर्धाव टाकल्यानंतर बुमराहनं गुप्टिलला बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजानं निकोलसला 28 धावांवर बाद केले. चहलनं कर्णधार विल्यम्सनला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर हार्दिक पांड्यानं मोक्याच्या क्षणी निशामला 12 धावांवर बाद केले. 44 ओव्हरमध्ये न्यूझीलंडन 200चा आकडा पार केला. तर, डी ग्रॅण्डहोम 16 धावांवर बाद झाला. रॉस टेलरनं 79 चेंडूत धिमी फलंदाजी केली मात्र त्यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले.

Loading...

आज रोहित बरसणार

एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या. रोहित या विक्रमाच्या अतिशय जवळ पोहोचला आहे. रोहितने 647 धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला केवळ 27 धावांची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्ध रोहितला हा विक्रम करण्याची संधी आहे. असे झाल्यास एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याचे नाव घेतले जाईल.

#NZvIND सामन्यात पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांकडून ट्रोल, या आणि इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...