माऊंट माँगानुई, 19 नोव्हेंबर: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात युवा टीम इंडिया एका नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा टी20 सामना आज माऊंट माँगानुईच्या मैदानात खेळवला जात आहे. वेलिंग्टनची पहिली टी20 पावसामुळे वाया गेली होती. दुसऱ्या टी20तही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण टॉस वेळेत झाल्यानं आजच्या सामन्यात खेळही वेळेत सुरु होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
A look at our Playing XI for the 2nd T20I.
Live - https://t.co/OvmynDiyd8 #NZvIND pic.twitter.com/WVZj6znsg8 — BCCI (@BCCI) November 20, 2022
युजवेंद्र चहलचं कमबॅक
हार्दिक पंड्या रोहितच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. हार्दिकनं या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन निवडताना युजवेंद्र चहलला संघात स्थान दिलं आहे. अनुभवी चहल टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघाचाही भाग होता. पण अख्ख्या वर्ल्ड कपमध्ये चहलनं बारावा खेळाडू म्हणून मैदानात पाणी देण्याचं काम केलं. पण न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात चहलनं कमबॅक केलं आहे.
हेही वाचा - BCCI: कोण होणार बीसीसीआयचा नवा चीफ सिलेक्टर? मुंबईच्या 'या' माजी खेळाडूचं नाव चर्चेत
टीम इंडियाची प्लेईंग XI - ईशान किशन, रिषभ पंत (विकेट किपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 cricket, Team india