Home /News /sport /

IND vs NZ : जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्याला मुकणार? किवींची शिकार करण्यासाठी विराटसेना सज्ज

IND vs NZ : जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्याला मुकणार? किवींची शिकार करण्यासाठी विराटसेना सज्ज

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

पहिल्या सामन्यात 6 विकेटनं विजय मिळवत पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0ने आघाडी घेतली आहे.

    ऑकलंड, 26 जानेवारी : भारत-न्यूझीलंड यांच्याच आज ईडन पार्क येथे दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. याआधी पहिल्या सामन्यात 6 विकेटनं विजय मिळवत पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0ने आघाडी घेतली आहे. त्यामुळं भारतीय संघात काही बदल होतील, असे चिन्ह दिसत नाही. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळं भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातही आपला दबदबा कायम राखण्यासाठी मैदानात उतरतील. दरम्यान सा सामन्यात जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळं दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी नवदीप सैनीला संघात जागा मिळू शकते. वाचा-केएल राहुलच्या खेळामुळे पंतचे भविष्य धोक्यात? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा दरम्यान, विराट या सामन्यात एक प्रयोग म्हणून दोन फिरकी गोलंदाजांना संघात जागा देण्यात येऊ शकते. त्यामुळं कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना संघात जागा मिळू शकते. त्यामुळं शार्दुल ठाकूरला बाहेर बसवले जाऊ शकते. दरम्यान, भारताकडे शिवम दुबेच्या रुपानं आणखी एक जलद गोलंदाज असल्यामुळं दोन फिरकी गोलंदाजांना जागा मिळू शकते. वाचा-मनीष पांडेने केली मोठी चूक! पंचांमुळे वाचला भारतीय संघ, पाहा VIDEO हेड टू हेड भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 12 टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 4 आणि न्यूझीलंडने 8 जिंकले आहेत. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांविषयी बोलताना, येथे दोन्ही संघांमध्ये एकूण सहा सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने दोन जिंकला आहे तर न्यूझीलंडने चार जिंकले आहेत. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानाविषयी बोलताना, दोन्ही संघांमध्ये दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, दोन्ही सामने भारतने जिंकले आहे. वाचा-VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली भारताचा संभाव्य संघ- विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि शिवम दुबे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या