मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मोठी बातमी! T20 सोबतच टेस्टमध्येही रोहित कॅप्टन, रहाणेला BCCI चा धक्का

मोठी बातमी! T20 सोबतच टेस्टमध्येही रोहित कॅप्टन, रहाणेला BCCI चा धक्का

पुढच्या 24 तासांमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट आणि टी-20 सीरिजसाठी (India vs New Zealand) टीम इंडियाची (Team India Squad) निवड होणार आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्मावर (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात येणार आहे. याचसह रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही कर्णधार असेल.

पुढे वाचा ...

मुंबई, 9 नोव्हेंबर : पुढच्या 24 तासांमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट आणि टी-20 सीरिजसाठी (India vs New Zealand) टीम इंडियाची (Team India Squad) निवड होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमधली (T20 World Cup) खराब कामगिरी आणि सातत्यानं खेळाडू क्रिकेट खेळत असल्यामुळे या सीरिजसाठी टीममध्ये मोठे बदल होणार आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्मावर (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात येणार आहे. याचसह रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही कर्णधार असेल, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

टीम इंडियाचा सध्याचा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीला पहिल्या टेस्टसाठी विश्रांती देण्यात येईल. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराटचं टीममध्ये पुनरागमन होईल, तेव्हा त्याला पुन्हा टेस्ट कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात येईल.

इंग्लंड दौऱ्यामध्ये अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कामगिरी निराशाजनक झाली. 4 सामन्यांमध्ये 15.57 च्या सरासरीने रहाणेला फक्त 109 रन करता आले. यानंतर रहाणेचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात आलं, असं असलं तरी रहाणेचं उपकर्णधारपद कायम राहणार आहे. टी-20 साठी केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा उपकर्णधार असेल.

जयपूर, रांची आणि कोलकात्यामध्ये तीन टी-20 मॅच खेळवल्या जातील, तर कानपूर आणि मुंबईमध्ये दोन टेस्ट होतील.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या ज्येष्ठ खेळाडूंना टी-20 सीरिजमधून विश्रांती दिली जाऊ शकते, तर वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) जागी टीममध्ये हर्षल पटेलला (Harshal Patel) संधी मिळण्याची शक्यता आहे. हर्षल पटेलने मागच्या दोन आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसंच श्रेयस अय्यरचंही (Shreyas Iyer) टी-20 टीममध्ये पुनरागमन निश्चित मानलं जात आहे. दीपक चहर आणि राहुल चहर हे दोन्ही भाऊदेखील टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसतील.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या जोडीसाठी न्यूझीलंडविरुद्धची सीरिज ही पहिली परीक्षा असेल. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 11 महिन्यांमध्ये लगेचच ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे नव्याने टीम बांधण्याचं आव्हान रोहित आणि राहुलच्या जोडीसमोर असेल.

'विराट कोहलीला टेस्टमध्ये विश्रांती देण्यामागे दुसरा कोणताही हेतू नाही. दुसऱ्या टेस्टपासून तोच पुन्हा कर्णधार असेल, कारण ही त्याचीच टीम आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

याशिवाय निवड समितीसमोर ऋषभ पंत (Rishabh Pant) विकेट कीपर म्हणून पहिली पसंती असेल, तर पर्यायी विकेट कीपर म्हणून ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) संधी द्यायची का आंध्र प्रदेशचा नवोदित केएस भरतचा (KS Bharat) विचार करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल.

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यापासूनच दोन कॅप्टनबाबतचा, तसंच बायो-बबलमध्ये वारंवार क्रिकेट खेळणं खेळाडूंना कठीण जात आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती देण्याचा विचार सुरू झाला होता. बीसीसीआय सध्या वनडे टीमच्या कॅप्टन्सीबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, कारण न्यूझीलंडविरुद्ध फक्त टी-20 आणि टेस्ट सीरिज होणार आहे. न्यूझीलंड सीरिज झाल्यानंतर टीम इंडिया डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचवेळी निवड समिती वनडेच्या कर्णधाराबाबत निर्णय घेईल.

First published:
top videos

    Tags: Ajinkya rahane, Rohit sharma, Team india, Virat kohli