• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs IND: ...अन् सामन्यादरम्यान घाबरली हिटमॅन रोहितची पत्नी रितिका

IND vs IND: ...अन् सामन्यादरम्यान घाबरली हिटमॅन रोहितची पत्नी रितिका

Ritika Sajdeh

Ritika Sajdeh

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्मा मैदानात उतरला. पण त्याच्या खेळीमुळे पत्नी रितिका सजदेहकचा (Ritika Sajdeh) श्वास रोखला. ती घाबरल्याचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) होत आहे. मॅचच्या 17 व्या बॉललाच ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) ईशान किशनला (Ishan Kishan) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर टीम इंडियाचा रोहित शर्मा मैदानात उतरला. पण त्याच्या खेळीमुळे पत्नी रितिका सजदेहकचा (Ritika Sajdeh) श्वास रोखला. ती घाबरल्याचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. हा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमसाठी करो या मरोचा आहे, कारण पाकिस्तानच्या टीमने सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. अशातच, ईशान किशनची विकेट घेतल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, यानंतर पहिल्याच बॉलला ट्रेन्ट बोल्टने टाकलेल्या बाऊन्सरवर रोहित शर्माने हूक शॉट मारला. पण फाईन लेगवर उभ्या असलेल्या एडम मिल्ने (Adam Milne) याने रोहित शर्माचा हातातला सोपा कॅच सोडला. पहिल्याच बॉलवर रोहित आऊट होणार या भितीने पत्नी रितिका घाबरली. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रितिकासोबत आर अश्विनची पत्नीदेखील  दिसत आहे. मिल्नेनी जीवनदान दिल्यानंतर रोहित शर्माने त्याच्या बॉलिंगचाही समाचार घेतला. रोहितने पाचव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला फोर आणि सहाव्या बॉलला सिक्स मारली. या सुरुवातीनंतरही रोहित शर्माला मोठा स्कोअर करता आला नाही. 14 बॉलमध्ये 14 रन करून रोहित आऊट झाला. ईश सोढीच्या बॉलिंगवर रोहित शर्मा मिड ऑनच्या वरून सिक्स मारायला गेला, पण मार्टिन गप्टीलने रोहितचा कॅच पकडला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: