• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ : आधी कॅप्टन्सी घेतली, आता वर्ल्ड रेकॉर्डही मोडणार! रोहित विराटला मागे टाकत होणार नंबर वन

IND vs NZ : आधी कॅप्टन्सी घेतली, आता वर्ल्ड रेकॉर्डही मोडणार! रोहित विराटला मागे टाकत होणार नंबर वन

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला जयपूरमध्ये सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये रोहित शर्माकडे (Rohit Sharma) विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand T20 Series) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला जयपूरमध्ये सुरुवात होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया पुन्हा नवी सुरुवात करणार आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार असेल, तर पुढच्या दोन वर्षांसाठी राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे रोहित शर्माकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील (Martin Guptill) दुसऱ्या आणि रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 94 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 87 इनिंगमध्ये 52.05 ची सरासरी आणि 137.91 च्या स्ट्राईक रेटने 3,227 रन केल्या आहेत, यामध्ये 29 अर्धशतकांचा समावेश आहे. मार्टिन गप्टीलने 109 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.11 ची सरासरी आणि 135.65 च्या सरासरीने 3,147 रन केले. गप्टीलला त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 करियरमध्ये 18 अर्धशतकं करता आली. या यादीमध्ये रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 116 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.32 च्या सरासरीने आणि 139.61 च्या स्ट्राईक रेटने 3,038 रन केले आहेत. एवढच नाही तर रोहितने 4 शतकं आणि 24 अर्धशतकं केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये 190 रन केल्या, तर तो विराट कोहलीचा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक रन करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकतो.
  Published by:Shreyas
  First published: